logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

कर्मचाऱ्यांच्या संपाने भू्मी अभिलेखचे कामकाज पूर्णपणे ठप्प! शेतकऱ्यांचे पारनेर अभिलेख कार्यालयात हेलपाटे "

रामदास ढोरमले
पारनेर, जी. अहिल्यानगर,

पारनेर : पारनेरचे भूमी अभिलेख कार्यालय गेल्या ८ दिवसांपासून ओस पडले आहे. आधीच प्रभारी
राज, त्यात कर्मचान्यांच्या संपामुळे कामकाज ठप्प झाले असून, शेतकन्यांसह सर्वसामान्यांना हैलपाटे मारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कायमच वादग्रस्त राहिलेल्या या कार्यालयाच्या
कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे. भुमी अभिलेखचे कर्मचारी संपावर गेले असून, शुक्रवारी (दि. २७) पुणे येथील जमावबंदी आयुक्त कार्यालयासमोर ते आक्रोश मोर्चा काढणार आहेत.
त्यात तोडगा न निघाल्यास बैमुदत काम बंद आदोलनाचा इशारा दिल्याने हा संपचिघ्ळण्याची
चिन्हे आहेत. पारनेरचे भूमी अभिलेखचे उपअधीक्षक माधवराव पाटील यांच्यावर
पेंडन्सीमुळे निलंबनाची कारवाई झाली. त्यानंतर राहाता येथील उपअधीक्षकांकडे प्रभारी पदभार
सोपवला आहे. त्यामुळे सध्या प्रभारी असल्याने कर्मचान्यांवर कुणाचाही अंकुश दिसत नाही. आधीच प्रतलंबित प्रकरणे व त्यात
संपामुळे ही पेंडन्सी ताढत जाणार आहे. भूमी अभिलेख कर्मचारी कृती समितीच्या वतीने १८
फेब्रुवारीपासून विविध प्रलॉबित मागण्यांसाठी असहकार आंदोलन चालू आहे. तांत्रिक वेतनश्रेणी लागू करावीत , सुधारित आकृतिबंधानुसार रिक्त
जागा भराव्यात , विभागाचे खासगीकरण करण्याचा निर्णय रद्द करावा, मोजणी बाब ही धोरणात्मक बाब म्हणून अंतर्भूत करू नये, तसेच जमाबंदी आयुक्त काय्यालयाच्या 'व्हर्जन-२' हे
'वर्जन-१ प्रमाणे सूटसूटीत करावे. अधिकारी व कर्मचाऱ्या वर चौकशी न करता फौजदारी गुन्हे
दाखल करू नयेत, प्रत्येक कर्मचाऱ्याला मोजणी त
इतर अत्यावश्ययक साहित्य पुरवण्याच्या मागण्यांसाठी हे आंदोलन सूरू आहे. या संपाचा
फटका हा शेतकऱ्यासह नागरिकांना बसत आहे.

0
0 views

Comment