logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

माळखांबीमधील केबल चोरीचे सत्र थांबेना शेतकरी वर्ग हवालदिल; चोरांना पकडण्याची मागणी


माळखाबी (ता.माळशिरस) येथे फेब्रुवारी महिन्यामध्ये चार वेळा शेतकऱ्यांच्या विहिरीवरील केबलच्या मोठ्या चोऱ्या झाल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. अकलूज पोलीस खात्याने या चोरांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.
रात्रीच्या सुमारास माळखांबी ग्रामपंचायत हद्दीमध्ये शेतकऱ्याच्या विहिर, बोअर, सोलार पॅनलवरिल तांब्याच्या केबल चोरी झाल्या आहेत. या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शेतकरी सध्या नैसर्गिक अशा अनेक अडचणीला सामोरे जात आहे. अशा मध्ये तांब्याच्या केबल चोऱ्या मोठ्या प्रमाणात दर ३ ते ४ महिन्याला चोरीला जात आहेत. केबल चोरी केल्यानंतर चोरटे केबल विहिरीत टाकणे, बोअरमध्ये टाकत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याच्या खर्चात अजुन भर पडत आहे.
अकलूज पोलीस खात्याने माळखांबी ग्रामपंचायत हद्दीमध्ये ज्या
शेतकरी सिद्धनाथ माने यांची इलेक्ट्रिक मोटार चोरीला गेली आहे. त्याचा पंचनामा करताना श्रीपूर औटपोस्टचे पोलीस कर्मचारी, माळखांबी पोलीस पाटील शेळके.
शेतकऱ्याच्या विहिर, बोअर, सोलार पॅनल वरिल तांब्याच्या केबल चोरी गेलेली आहे त्याचा तपास करावा, अशा मागणी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी माळखांबी येथील शेतकरी तानाजी गमे यांच्या डीपी मधील ऑइल रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी विद्युत
प्रवाह खंडित करून त्या डीपी मधील शंभर लिटर ऑइल अंदाजे रक्कम दहा हजार रुपये एवढे ऑइल रात्रीच्या सुमारास येऊन जाऊन चोरी केली आहे.
आत्तापर्यंत कमीत कमी १०० शेतकऱ्यांच्या शेतातील ताब्याच्या केबल चोरीला गेल्या आहेत. अशा
एकाच शेतकऱ्यांच्या शेतात तीनदा चोरी
माळखांबी गावामधील शेतकरी शेखर भास्कर गमे हे मोटार रिवायडिंग चा व्यवसाय करतात. त्यांच्या वस्तीवरही चोरीचा प्रकार झाला आहे. ७ फेब्रुवारी रोजी रात्री प्रथम त्यांच्या शेळ्या चोरीला गेल्या लगेच ९ रोजी शेतीतील २०० फुट तांब्याची केबल, गॅस, शेगडी लायटर, शेतातील शेतमाल मोजायचा इलेट्रिक वजन काटा १२५ किलो ताब्याची तार चोरीला गेली. चोरीचा तिसरा प्रयत्न १० फेब्रुवारी रोजी रात्री झाला. त्यामुळे शेखर भास्कर गमे आणि त्याचे कुंटुबिय रोज रात्र जागून काढत आहेत. शेतकऱ्यांचे रितसर पंचनामे करून चोरांना शोधून योग्य ती कायदेशिर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

0
132 views

Comment