logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मराठी राजभाषा दिवस अध्यापक विद्यालयात साजरा


ताराचंदजी निखाडे अध्यापक विद्यालय साकोली जिल्हा भंडारा येथे मराठी राजभाषा दिवस मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरा करण्यात आला. मराठी भाषेचे संवर्धन, संवर्धन आणि प्रचार यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व मराठी भाषेच्या प्रतिमापूजनाने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री.खेमराज पी राऊत तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. नीता टी.टेंभरे प्रा. लीलावती सुपारे प्रा. गेंदलाल इंदुलकर प्रा.राजेंद्र मांदाडे प्रा. अश्विनी खलोदे प्रा.रामगोपाल कापगते प्रा. डी पी घरडे तसेच विद्यार्थिनी कु. रश्मी त्रिपात्रे ,पौर्णिमा शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.प्राचार्यांनी भाषणात मराठी भाषेचे ऐतिहासिक महत्त्व, तिची समृद्ध परंपरा आणि आधुनिक काळातील उपयुक्तता यावर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच प्रमुख पाहुण्यांनी सुद्धा मराठी राजभाषा या विषयावर सविस्तर माहिती दिली. “मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती आपली सांस्कृतिक ओळख आहे,” असे त्यांनी नमूद केले. यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी कविता वाचन, भाषण, वाचन, कथाकथन तसेच मराठी भाषिक शब्दकोडे यावर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. भोयर प्रा.भगत प्रा. विजया पडोळे प्रा. शीला पडोळे प्रा. मोहन रहिमतकर तसेच शिक्षकेतर कर्मचारी डी आर झोडे आनंद गायकवाड राजानंद मेश्राम व डीएलएड प्रथम व द्वितीय वर्षाचे छात्रध्यापक यांनी सहकार्य केले
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा सन्मान राखण्याचा आणि तिच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प केला.
अशा प्रकारे अध्यापक विद्यालयात मराठी राजभाषा दिवस प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.

63
3570 views

Comment