कर्मचाऱ्यांचे ठेकेदारकडून आर्थिक, मानसिक शोषन
पुणे.
5 हजार पेक्षा अधिक कंत्राटी कर्मचारी पिंपरी महापालिकेतकार्यरत आहेत. ठेकेदारांकडून त्यांचे आर्थिक, मानसिक शोषण मोठ्याप्रमाणात होत आहे. काही ठेकेदरांनी कर्मचा-यांचे ATM स्वतःकडे ठेवले असून पगार झाल्यावर 10 हजार रुपये कमिशन काढून घेतात आणि कामगारांना 14-15 हजार रुपये पगार देतात. नवनिर्वाचित लोकप्रतिनिधिनी याबाबत या कामगारांना न्याय देण्यासाठी ठेकेदारांवर कारवाई करावी. कंत्राटी कर्मचाऱ्यांना योग्य आर्थिक मोबदला मिळवून द्यावा. असे मत कामगार नेते यशवंत भोसले यांनी मांडले.
मुकनायक पत्रकार मंच्याच्या वतीने पिंपरी येथील सावित्रीबाई फुले स्मारक येथे मुकानायक पाक्षिकाच्या वर्धापनदिनानिमित्त एकदिवसीय पत्रकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार, विचारवंत आणि नागरिक उपस्थित होते.