logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा निवडणूक : ॲड. आशिष गोधमगावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा निवडणूक : ॲड. आशिष गोधमगावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नांदेड ( विशेष प्रतिनिधी )

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा निवडणुकीसाठी नांदेडसह महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. जानकीरामन उर्फ आशिष गोधमगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मुंबई येथे गुरुवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी दाखल केला.
ॲड. जानकीरामन उर्फ आशिष गोधमगावकर यांनी आपल्या कार्यकाळात नांदेडसह राज्यभरात विविध क्षेत्रात उत्कृष्ट व श्रेष्ठ विधीज्ञ म्हणून प्रसिद्धी मिळवलेली आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोव लढवण्याचा निर्णय घेतल्याने मराठवाड्यातील वकील वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ॲड. गोधमगावकर सध्या नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाचे अध्यक्ष असून यापूर्वी त्यांनी जिल्हा सरकारी वकील म्हणूनही उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क असून, मराठवाड्यासह राज्यभरातील अनेक विधीज्ञांनी या निवडणुकीत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने ही निवडणूक ते निश्चितच जिंकतील असा आशावाद व्यक्त केला जात आहे. या निवडणुकीसाठी त्यांचे सूचक म्हणून जिल्हा अभिवक्ता संघाचे माजी अध्यक्ष ॲड. उमेश मेगदे व सरकारी वकील म्हणून काम पाहिलेले ॲड. रमेश राजूरकर हे अनुमोदक आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना महाराष्ट्रातील अनेक नामवंत विधिज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडणुकीसाठी येत्या २४ मार्च रोजी मतदान होणार आहे.
चौकट : वकील मंडळींचे हित जोपासण्यासंदर्भात सेवा, पारदर्शक कारभार आणि सर्वांगीण विकास या मूल्यांवर विश्वास ठेवून मी ही उमेदवारी आपल्या सर्वांच्या आग्रहाचा सार्थ अभिमान ठेवत स्वीकारत आहे. विधीज्ञांचे प्रश्न, अपेक्षा आणि गरजा प्रामाणिकपणे अभ्यास करून त्यावर सकारात्मक उपाययोजना करणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट पूर्वीही होते आताही आहे आणि पुढेही राहील. आपल्या सर्वांचा पाठिंबा, विश्वास आणि सहकार्य मला यापूर्वी सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळालेले असून ते आताही लाभेल, अशी अपेक्षा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा या निवडणुकीतील उमेदवार ॲड. जानकीराम उर्फ आशिष गोधमगावकर यांनी व्यक्त केली आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views

Comment