logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

दरोडा व जबरी चोरी करणारे पैठणचे 02 आरोपी ताब्यात;03 गुन्हे उघड...


दरोडा व जबरी चोरी करणारे पैठणचे 02 आरोपी ताब्यात;03 गुन्हे उघड...

नगर (शिवप्रहार न्यूज नेटवर्क)
या बातमीची हकीगत अशी की, फिर्यादी प्रतिभा पंढरीनाथ साठे रा. नारायणडोह, ता. जि. अहिल्यानगर यांचे पती घरासमोर झोपलेले असतांना दिनांक 22/02/2026 रोजी रात्री 02.00 वा. चे सुमारास अनोळखी 5 आरोपींनी फिर्यादीचे पती यांच्यावर चाकुने वार करुन तसेच घराचा दरवाजा कटावणीचे सहाय्याने उचकटुन घरातील लोकांना काठीने मारहाण केली व घरातील 2,17,500/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने दरोडा टाकुन चोरुन नेले आहेत. सदर घटनेबाबत नगर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 112/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310 (2), 311 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
वरीलप्रमाणे गुन्हा घडल्यानंतर गुन्हा ठिकाणी श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी गुन्हा ठिकाणी भेट देवुन गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना दिलेल्या आहेत. सदर सुचनांनुसार पोनि किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हरिष भोये, पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, फुरकान शेख, दिपक घाटकर,अतुल लोटके,शामसुंदर जाधव,भाऊसाहेब काळे,अमोल कोतकर, सागर ससाणे, बाळासाहेब गुंजाळ, बाळासाहेब खेडकर, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार ज्योती शिंदे, भगवान धुळे यांचे पथक तयार करुन सदर पथकास गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना व मार्गदर्शन करुन रवाना केले.
वर नमुद पथकाने यापुर्वी दरोड्याचे गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले आरोपींची माहिती संकलित करुन व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती काढत असतांना पथकास दिनांक 25/02/2026 रोजी गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा हा सोमीनाथ काळे रा. कौंडगांव, ता. पैठण याने व त्याचे इतर साथीदारांनी केला असल्याची व ते पांढरे रंगाचे कारमधुन चांदबिबी महाल येथुन वाळुंज कडे जाणारे असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने तात्काळ चांदबिबी महाल परिसरामध्ये सापळा रचुन फोर्ड फिस्टा कार क्रमांक एम. एच. 03 बी. एच. 9002 ही व त्यामधील दोन इसम ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) सोमीनाथ उर्फ पिप्या मिनाजी काळे वय 30 वर्षे, 2) चिंग्या उर्फ सौरभ सचिन काळे वय 21 वर्षे, दोन्ही रा. कौंडगांव तांडा, कौडगांव, ता. पैठण, जि.छ. संभाजीनगर असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमांकडे व्यवसायिक कौशल्याचे आधारे सखोल तपास करता त्यांनी वरील प्रमाणे गुन्हा हा त्यांचे साथीदार 3) चिक्या गोप्या चव्हाण रा. कौंडगांव तांडा, कौडगांव, ता. पैठण, जि. छ. संभाजीनगर(फरार), 4) तुषार नंदु भोसले रा. सदर, 5) आसिफ निमाजी काळे रा. सदर (फरार), 6) भगवान इंपीरियल चव्हाण रा. वाळुंज, ता. जि. अहिल्यानगर (फरार) अशांनी केला असल्याची कबुली दिली असुन आरोपींकडुन खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.
अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम
1 नगर तालुका 112/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310 (2), 311
2 नगर तालुका 113/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310 (2), 311
3 भिंगार कॅम्प 66/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(6)
आरोपीचे कब्जातुन गुन्ह्याचे वेळी वापरलेली 3,00,000/- रुपये किंमतीची कार, 12,000/- रुपये किमतीचे 02 मोबाईल असा एकुण 3,12,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी नगर तालुका पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास नगर तालुका पोलीस ठाणे हे करीत आहेत. सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

1
222 views

Comment