logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

दादासाहेब सरफरे विद्यालयात तालुकास्तरीय ‘जीनियस हंट’ स्पर्धा परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद



[ संगमेश्वर | २७ फेब्रुवारी २०२६ ]

बूरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित दादासाहेब सरफरे विद्यालय व कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येथे तालुकास्तरीय आंतरशालेय जीनियस हंट स्पर्धा परीक्षा २०२६ उत्साहात पार पडली. तालुक्यातील विविध शाळांमधून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण १४ शाळांतील ४१ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे उदघाटन अध्यक्ष शरद बाईत यांच्या हस्ते संपन्न झाले . पंचायत समिती संगमेश्वरचे गटशिक्षणाधिकारी विजय परीट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेच्यावतीने शाल व सन्मानचिन्ह देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना विजय परीट म्हणाले की,स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, कठोर परिश्रम, शिस्त आणि निर्व्यसनी जीवनशैली अत्यावश्यक आहे. नियमित अभ्यास, ध्येयावर लक्ष केंद्रीत ठेवणे आणि शारीरिक तंदुरुस्ती यांमुळे यश निश्चित मिळते.

तसेच शालेय स्तरावर अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, तार्किक विचारसरणी, आत्मविश्वास आणि वेळेचे नियोजन कौशल्य विकसित होते, असेही त्यांनी नमूद केले.

दुपारच्या सत्रात बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रताप देसाई हे उपस्थित होते . महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत डीवायएसपी पदावर नियुक्त झालेल्या मनीषा खेडेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांचा संस्थेच्या वतीने शाल व सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. आपल्या प्रेरणादायी भाषणात त्यांनी सांगितले की स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सरकारी सेवेत प्रवेश करून समाजसेवा करण्याची सुवर्णसंधी मिळते.

विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच स्पर्धात्मक दृष्टीकोन जोपासल्यास मोठ्या परीक्षांमध्ये यश मिळवणे सोपे जाते.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी प्रथम क्रमांक: कुमार निषाद संदीप मोहिते (कै. मीनाताई ठाकरे विद्यालय, साडवली)द्वितीय क्रमांक: तन्वी राजेंद्र कदम (श्रीमान तु. ग. गांधी विद्यालय, कोंडगाव)तृतीय क्रमांक: माही गिरीश वनकर (कै. मीनाताई ठाकरे विद्यालय, साडवली)उत्तेजनार्थ: अनन्या कुलदीप डोळस (दादासाहेब सरफरे विद्यालय, बुरंबी-शिवने) व सृष्टी बालाजी गुंजीटे (श्रीमान तु. ग. गांधी विद्यालय, कोंडगाव)विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे, सन्मानचिन्हे व गौरव प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

संस्थेचे उपाध्यक्ष प्रताप देसाई यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे सरचिटणीस शरद बाईत, स्कूल कमिटी अध्यक्ष दिनेश जाधव, संचालक सचिन मोहिते, शांताराम जाधव तसेच विषयतज्ञ समीर काबदुले उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप जाधव, सुहास पाब्ये, नीलम पवार यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शिक्षक संदीप नटे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सुहास पाब्ये यांनी मानले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी कौतुक केले असून भविष्यातही अशा स्पर्धा आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.सहभागी शाळेचे मार्गदर्शक शिक्षक यांनी हा उपक्रम तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे . सहभागी मार्गदर्शक शिक्षकांनी शाळेचे व बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे आभार मानले.

1
412 views

Comment