उत्तमचंद बगडिया महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा..
रिसोड : उत्तमचंद बगडिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रिसोड येथील मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास उलगडत “ज्या मायबोलीने आपणाला घडविले, तिचा आदर केला पाहिजे,” असे सांगितले.
प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. एम. पी. खेडेकर यांनी केले. त्यांनी कुसुमाग्रजांचे कविता संग्रह, कथासंग्रह, कादंबऱ्या आणि नाटके यांचा उल्लेख करत, त्यांच्या साहित्यामुळे मराठी भाषा अधिक समृद्ध झाल्याचे सांगितले. प्रमुख मार्गदर्शक प्रा. संदीप जुनघरे यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे संदर्भ देत कणा या कवितेचे रसग्रहण विद्यार्थ्यांना करून दिले. तसेच नटसम्राट मधील वृद्ध अप्पा बेलवणकरांच्या दुःखातून आजच्या वृद्धांच्या समस्या त्यांनी अधोरेखित केल्या.
या निमित्ताने काव्यवाचन स्पर्धा, कुसुमाग्रज साहित्यावर परिसंवाद आणि मराठी भाषेचे महत्त्व अधिक स्पष्ट करण्यासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
स्पर्धांचे निकाल असे :
काव्यवाचन स्पर्धा : प्रथम – कैलास जाधव, द्वितीय – मेघा इंगळे, तृतीय – रक्षा शिदे
परिसंवाद : प्रथम – ममता लाटे, द्वितीय – अजेश चव्हाण, तृतीय – सलोनी अंभोरे
निबंध स्पर्धा : प्रथम – पूजा मोरे, द्वितीय – अनिकेत खरात, तृतीय – स्वप्निल चोपडे
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुमित लाहोरे यांनी केले, तर आभार प्रा. पूजा पाठक यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. टिकार, प्रा. डॉ. नंदेश्वर, प्रा. डॉ. ए. जी. वानखेडे, प्रा. डॉ. बुधवंत, प्रा. डॉ. मेश्राम, प्रा. वाघ, प्रा. राम जुनघरे, प्रा. मनवर, प्रा. राऊत, प्रा. साबळे, प्रा. पांढरे आणि डॉ. नरवाडे यांच्यासह अनेक प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. बाजऊ, प्रा. बोंडे मॅडम, प्रा. काळे मॅडम, प्रा. प्रजापती, श्री ओकार पूरी, श्री बिल्लारी, श्रीमती भोसले, श्रीमती नरवाडे, संतोष घुगे, सुनिले चराटे, महेश पांडे, मयुर मगर यांनी परिश्रम घेतले. तसेच विद्यार्थ्यांपैकी अनुराधा सोनुने, कार्तिक गवळी आणि विश्वनाथ लाड यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाला सुमारे दोनशे विद्यार्थी उपस्थित होते.