logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

भारताच्या आव्हानाला झिम्बाब्वे संघाची कडवी झुंज अपयशी,भारताने ७२ धावांनी धुव्वा उडवलानन

[ चेन्नई | २७ फेब्रुवारी २०२६ ]

भारत विरुद्ध झिंबाब्वे यांच्या दरम्यान काल झालेल्या सामन्यात झिम्बाब्वे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती.

कालचा सामना भारताच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा होता.त्याच अनुषंघाणे फलंदाजी साठी आलेल्या भारतीय संघाच्या सलामीवीरांनी डावाची ताबडतोड सुरुवात केली होती.

संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी डावाची सुरवात करताना पवारप्ले मध्ये धावसंख्या वाढवण्यावर भर दिला. संजू सॅमसन ची विकेट गेली. त्यानंतर आलेल्या ईशान किशन आणि अभिषेक शर्मा यांनी धावांची गती कायम ठेवत चौफेर फटकेबाजी केली.ईशान किशन बाद झाल्यावर सूर्यकुमार ने कर्णधाराला साजेसा खेळ करत अतिशी धावा जमवण्यास सुरवात केली.

हार्दिक पांड्या आणि अभिषेक शर्मा ने आपले वैयक्तिक अर्धशतक नोंदविले.तर तिलक वर्मा ने ताबडतोड फलंदाजी करून भारताची धावसंख्या २५६ वर पोहचवली.

प्रत्युत्तर देण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वे संघाने देखील सुरवाती पासून भारतीय गोलंदाजीचा सपाटून समाचार घेत धावांचा पाठलाग करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले असता .त्यांचा सलामीवीर अक्षर पटेल च्या पहिल्याच षटकात बाद झाला.

कर्णधार सिकंदर रजा आणि सलामी वीर ब्रेन बेनेट ने धावांच्या जवळ कसे जाता येईल यावर भर दिला.मात्र ब्रेन बेनेट याला योग्य साथ कोणाचीच मिळाली नाही.भारतीय संघाची गोलंदाजी अतिशय साधारण होती.त्यामध्ये शिवम दुबे ज्याने सर्वाधिक धावा दिल्या.ब्रेन बेनेट ने एकाकी दिलेली झुंज अखेर अपुरी पडली त्याने सर्वाधिक ९७ धावा करत योग्य योगदान दिले. मात्र संघाला प्रभावापासून वाचवू शकला नाही.

भारताने हा सामना ७२ धावांनी जिंकून आपला सेमी फायनल मध्ये जाण्याचा मार्ग काहीसा मोकळा केला असून पुढील होणारा वेस्ट इंडिज विरुद्ध सामना हा करो या मरो या स्थितीत आहे.सामना जिंकणारा संघ हा सेमी फायनल साठी पात्र ठरणार आहे.

2
220 views

Comment