सहयोग मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बँकेच्या नव्या नाशिक शाखा जल्लोषात उद्घाटन....
नाशिक
महाराष्ट्र
नाशिक : सहयोग मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बँकेच्या नाशिक येथील नव्या शाखेचे उद्घाटन गुरुमाऊली परमपूज्य आण्णासाहेब मोरे प्रमुख – श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत) यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात व भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न झाले. या प्रसंगी परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
उद्घाटन सोहळ्यात मार्गदर्शन करताना गुरुमाऊली मोरे दादा यांनी बँकेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देत, “सहयोग मल्टीस्टेट बँक लवकरच १०० शाखांचा टप्पा पूर्ण करेल,” असा आशिर्वाद दिला. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी उपस्थितांमध्ये नवचैतन्य संचारले.
यावेळी बँकेचे चेअरमन दिगंबर टेकाळे,बँक चे संचालक मंडळ अतुल गलधर, सुभाष टेकाळे, ज्ञानेश्वर दिलवाले,अनिल मंडलिक,जाधव श्रीराम,सावता दिलवाले,बाळासाहेब गवारे, संतोष अंतरकर, उद्धव मचे,दिपक माने, भरत टेकाळे, भगवान माळवदे, अमोल गाडेकर, उमेश दिलेवाले व राजेंद्र लोखंडे निलेश बोराडे,वैद्य दिनकर, बोडखे प्रविण,महेश कावने,शुभम पापळ, विनोद गायकर,नाशिक शाखा व्यवस्थापक संदीप थोरात व पूर्ण कर्मचारी वर्ग तसेच व्यापारी, शेतकरी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी बँकेच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातील यशासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.नवीन शाखेमुळे नाशिक परिसरातील नागरिक, व्यापारी व शेतकरी वर्गाला बँकिंग सेवा अधिक सुलभ व जलद मिळणार असून स्थानिक आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.
कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यात आली.