logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

महिलेला जिवे मारण्याची धमकी देत विनयभंग



जळगाव : शहरातील पिंप्राळा परिसरात एका २६ वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिला मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

ही घटना दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. फिर्यादी महिला (वय २६) ही आपल्या कामात असताना, आरोपी आशिष पांडुरंग जोहरे (रा. पिंप्राळा) याने तिचा विनयभंग केला. तसेच आरोपीने पीडित महिलेला चापटा-बुक्क्यांनी बेदम मारहाण देखील केली.-

ही घटना कोणाला सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे. पीडितेने रामानंदनगर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली.

5
382 views

Comment