logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

रेल्वेच्या जागेत उद्यान निर्मितीचा प्रस्ताव तसेच दौंड–पुणे डेमू गाड्यांच्या अनियमिततेबाबत निवेदन.

दौंड शहरातील नागरिकांना विरंगुळा व हरित वातावरण मिळावे यासाठी रेल्वेच्या जागेत उद्यान कसे विकसित करता येईल, याबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. यावर डीआरएम साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक त्या स्तरावर पाठपुरावा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.

🔹 दौंड–पुणे डेमू गाड्यांच्या अनियमिततेबाबत निवेदन.

दौंड–पुणे डेमू गाड्या अनियमित धावत असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात दौंड प्रवासी वर्गाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
प्रामुख्याने खालील गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे:
• ७१४०२ दौंड-पुणे डेमू (सकाळी ६:०५)
• ७१४०४ दौंड-पुणे डेमू शटल (सकाळी ७:०५)
• ७१४०६ बारामती-पुणे डेमू (सकाळी ८:२५)
• ७१४०७ पुणे-दौंड डेमू (दुपारी ३:००)
• ७१४११ पुणे-बारामती डेमू (संध्याकाळी ६:४५)
• ७१४१३ पुणे-दौंड डेमू (रात्री ८:०५)

दैनंदिन प्रवाशांची होणारी ही गैरसोय थांबवण्यासाठी आणि या गाड्या वेळेवर धावतील याची खात्री आज दिली.
प्रायोगिक तत्वावर दौंड - पुणे - शटल साठी अतिरिक्त कोच लावून एक ट्रायल लवकरच करण्यात येणार आहे आणि त्या नंतर इतर डेमू लोकल ला अतिरिक्त कोच लावणार असल्याचे डि आर एम साहेबानी नमूद केले.
संबंधित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन डीआरएम राजेश कुमार वर्मा साहेबांनी दिले.

या भेटीदरम्यान दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. अवधूत तावडे साहेब, दौंड नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष कु. दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे व नगरसेवक श्री.इंद्रजीत जगदाळे उपस्थित होते.

68
3289 views

Comment