अजित पवारांच्या अपघातानंतर शिंदेंचा मोठा निर्णय
‘VSR’ विमानांचा वापर थांबवला
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
शिवसेना (शिंदे गट) पक्षीय दौऱ्यांसाठी ‘VSR’ कंपनीची विमाने किंवा हेलिकॉप्टर यांचा वापर करणार नाही, असा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. संबंधित कंपनीच्या सुरक्षा आणि तांत्रिक बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने पक्षातील आमदारांनी शिंदेंकडे ही मागणी केली होती.
नेत्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्षाच्या आगामी दौऱ्यांसाठी पर्यायी सुरक्षित विमानसेवा वापरण्याबाबतही चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून विरोधकांकडूनही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.