logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

हिंदी मराठी पत्रकार संघाचा निर्णय; रविकुमार शिंदे यांना मोठी जबाबदारी......

अहिल्या नगर जामखेड : हिंदी मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने रविकुमार शिंदे यांना संघटनेचे अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले असून त्यांची जामखेड तालुका संघटक (संयोजक) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
पत्रकारिता क्षेत्रातील सक्रिय कार्य, सामाजिक विषयांवरील सातत्यपूर्ण पाठपुरावा तसेच संघटनात्मक बांधिलकी लक्षात घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. शिंदे यांच्या नियुक्तीमुळे जामखेड तालुक्यातील पत्रकारांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध होऊन पत्रकारांच्या विविध प्रश्नांना योग्य दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
नियुक्तीनंतर बोलताना रविकुमार शिंदे यांनी संघटनेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत पत्रकारांच्या हक्कांसाठी, संरक्षणासाठी व एकजुटीसाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच तालुका स्तरावर संघटना अधिक मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
#RavikumarShinde
#Jamkhed
#Journalist
#HindiMarathiPatrakarSangh
#PressNews
#Media
#Journalism
#Patrakar
#MaharashtraNews
#Ahmednagar
#Ahilyanagar
#BreakingNews
#Appointment
#MediaUpdate
#JournalistUnity
#PatrakarEkta
#NewsUpdate

2
657 views

Comment