logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

भिवंडीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर (शक्तिपीठ) वर्धापन दिन सोहळा; नितीन गडकरींना दिल्लीत जाऊन दिले निमंत्रण!

भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा येथे उभारण्यात आलेल्या, महाराष्ट्रातील पहिल्या भव्य 'श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर (शक्तिपीठ)' या मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या मंगलमय सोहळ्याचे आग्रहाचे निमंत्रण देण्यासाठी भिवंडीचे लोकसभेचे खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांच्या पुढाकाराने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीनजी गडकरी यांची दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेण्यात आली.
यावेळी गडकरी साहेबांनी निमंत्रणाचा आनंदाने स्वीकार केला आणि "कार्यक्रमास नक्की येणार" असे सकारात्मक आश्वासन दिले.
महत्वाची उपस्थिती:
या भेटीदरम्यान गडकरी साहेबांना मंदिराच्या कार्याची व वर्धापन दिन सोहळ्याची माहिती देण्यात आली. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून:
• ह.भ.प. कैलास महाराज निचिते (प्रमुख मार्गदर्शक)
• डॉ. राजूभाऊ चौधरी (मुख्य विश्वस्त, शिवक्रांती प्रतिष्ठान)
हे उपस्थित होते.
शिवभक्तीचे भव्य शक्तिपीठ:
भिवंडीतील हे मंदिर स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुना असून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची प्रेरणा देणारे हे महाराष्ट्रातील पहिले मंदिर आहे. गेल्या वर्षी मोठ्या थाटामाटात या मंदिराचे उद्घाटन झाले होते. आता या ऐतिहासिक वास्तूचा पहिला वर्धापन दिन सोहळा तितक्याच भव्य स्वरूपात साजरा करण्याचे नियोजन सुरू आहे.
नितीन गडकरींसारख्या दिग्गज नेत्याच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त होणार आहे. या सोहळ्यासाठी भिवंडीसह संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

22
2317 views

Comment