स्व.नरसिंगराव बोडखे विद्यालयाची उत्तुंग भरारी....
स्व.नरसिंगराव बोडखे विद्यालयाची उत्तुंग भरारी....
धोडप बु. येथील श्री दत्तात्रय शिक्षण विकास संस्थेच्या स्व.नरसिंगराव बोडखे विद्यालयाने डिसेंबर-2025 मध्ये झालेल्या ''राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना'' परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.
विद्यालयाचे तब्बल 05 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेसाठी एकूण 12 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यामध्ये उत्तीर्ण विद्यार्थी पुढील प्रमाणे सतीश भगवान अर्जित कर, संकेत दीपक बोडखे, स्नेहल प्रताप जुमडे, प्रज्ञा गौतम कटारे व कल्याणी संदीप बदामे या विद्यार्थी-विद्यार्थीनी़नी घवघवीत यश संपादन केले आहे. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र भाऊ गायकवाड साहेब, संस्थेचे सचिव संतोषराव गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाचे मुख्याध्यापक सज्जनराव बाजड, ज्येष्ठ शिक्षक दिलीप भिसडे, प्रवीण जमधाडे, श्रीकृष्ण रहाटे, विजय आढाव, सुधीर धांडे, अनंत बोडखे, विजुभाऊ बोडखे व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व त्यांना शिकवणाऱ्या शिक्षक वृंदांचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रवींद्रभाऊ गायकवाड साहेब संस्थेचे सचिव संतोष राव गायकवाड साहेब व सर्व पालकांनी व गावकरी मंडळींनी समाधान व्यक्त केले आहे.