logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

तुमसरात वाळू माफियांवर पहाटेची धडक! दीड कोटींचा मुद्देमाल जप्त, प्रशासनाची कडक कारवाई


तुमसरात वाळू माफियांवर पहाटेची धडक!
दीड कोटींचा मुद्देमाल जप्त, प्रशासनाची कडक कारवाई

विलास केजरकर भंडारा.

भंडारा: जिल्हा प्रशासनाने अवैध वाळू वाहतुकीविरोधात प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर पाऊल उचलत पहाटेच्या सुमारास धडक कारवाई केली. उपविभागीय अधिकारी श्री. उपेश अंबादे यांच्या आदेशावरून भरारी पथकाने मोहाडी तहसीलमधील देव्हाडा खुर्द येथील रेल्वे पुलाखाली लपवून ठेवलेले चार टिप्पर जप्त केले.
माहितीनुसार आज पहाटे सुमारे ४ वाजता अचानक गस्त मोहीम राबविण्यात आली. तहसील मोहाडी व तहसील तुमसर येथील अधिकारी- कर्मचाऱ्यांना तत्काळ गस्तीचे आदेश देण्यात आले होते. गस्तीदरम्यान देव्हाडा खुर्द परिसरातील रेल्वे पुलाखाली विनापरवाना रेतीची वाहतूक करणारे ट्रक क्रमांक MH 36 F 3430, MH 49 BZ 5602, MH 49 BZ 8702 व 40 DC 5295 आढळून आले.
सदर वाहने तात्काळ जप्त करून पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालय मोहाडी येथे आणण्यात आली. या कारवाईत अंदाजे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
ही कारवाई तुमसरचे नायब तहसीलदार श्री. अप्पासाहेब वनखेडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. मंडल अधिकारी विलास धावडे, ग्रामविकास अधिकारी आशिष कुकडे, आयुष गणवीर, गजानन उपराडे तसेच मोहाडीच्या तहसीलदार श्रीमती प्राजक्ता बुरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकातील ग्राम महसूल अधिकारी कार्तिक शिरस्कर, विकास कदम, महसूल सेवक चंद्रकुमार नंदनवार यांनी तुमसर पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.
अचानक झालेल्या या धडक कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून अवैध उत्खनन व वाहतुकी विरोधात प्रशासनाची भूमिका अधिक कठोर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
0 views

Comment