logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*माजी विद्यार्थ्यांनी केली ३३ वर्षांनी शैक्षणिक सहल* *जुन्या आठवणींना उजाळा देत घेतला आनंद*


*माजी विद्यार्थ्यांनी केली ३३ वर्षांनी शैक्षणिक सहल*
*जुन्या आठवणींना उजाळा देत घेतला आनंद*

*विलास केजरकर*

*भंडारा* :- जनता शिक्षण संस्था व्दारा संचालित बुटी विद्यालय खमारी (बुटी) येथील सन १९९३-१९९४ ला शिकलेल्या १० वी वर्गाच्या बॅच‌मधील पुनर्मिलन शिक्षक -शिक्षिका व विद्यार्थी- विद्यार्थिनींचा गेट- टुगेदर कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र येऊन बुटी विद्यालय खमारी च्या भव्य परीसरात पार पडले. त्यानंतर रावनवाडी येथील निसर्गरम्य सहलीचा आनंद मोठ्या उत्साहात घेतला आहे.
हृदयाच्या नाजूक कप्प्यात साठवलेल्या आठवणी तब्बल ३२ वर्षांनंतर त्याच ठिकाणी, सौगंड्यांसोबत, वातावरणात उलगडल्या गेल्या. त्यामुळे भावना शब्दांच्याही पलीकडच्या ठरतात. आठवणींची स्पंदने तशीच साठवत निरोप घेताना अनेकांना गहिवरून आले. मित्र मिलाप हा आगळा वेगळा उपक्रम १९९३-९४ बॅचचे मित्र-मैत्रिणी तब्बल ३२ वर्षांनी भेटल्याने या विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आणि बालपण सगळे डोळ्यांसमोर उभे राहिले होते.
त्यावेळी भोजराज मडामे, रत्नमाला बांते, पुष्पा कुथे, तिलोत्तमा घुटके, रंजना शेंडे, गंगाधर नंदूरकर, शालिक गोमासे व वसंता अहिरकर यांनी उत्कृष्ट चवदार वनभोजन तयार केला. आणि त्यांच्यासह काही विद्यार्थी- विद्यार्थीनी मनोगतात भूतकाळातील आठवणी ताज्या केल्य तसेच प्रत्येकजण आपल्या हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवलेल्या लहान पणीच्या आठवणी तब्बल ३२ वर्षानी शाळेच्या माजी विद्यार्थी -विद्यार्थिनींनी ताज्या केल्या. दूर दूर गेलेले सर्व जण एकमेकांना भेटत होते व‌ सेल्फी काढत होते. उपस्थित सर्व माजी विद्यार्थी -विद्यार्थिनींनी डॉन्स केले. त्यात शालिक गोमासे यांनी उत्कृष्ट नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वसंता अहिरकर, भोजू मडामे, गंगाधर नंदूरकर, तिलोत्तमा घुटके, रंजना शेंडे, पुष्पा कुथे, सुभाष फेंडर, भाऊदास नंदेश्वर, अभिमन कोडापे, शालिक गोमासे, राजू खोब्रागडे, अंतकला मेश्राम, मंगला शेंडे, कलाबाई केजरकर, संध्या बन्सोड, सविता टेंभुर्ण, ज्योती बन्सोड, प्रमोद मेश्राम, लालावती देशमुख, संदिप लांडगे, भगवान टेंभुर्णे, सुनिता ठवकर, तनुजा शेंडे, सरिता मेश्राम, सुवर्णा रामटेके, विलास केजरकर, अनिमोदन बन्सोड, सुदेशना मेश्राम, माधुरी अहिरकर, संजय करवाडे, भगवान सेलोकर, सुनिल चौधरी, आर्या कोडापे, भिमांसी टेंभुर्णे, जिया देसाई, राकेश मडामे, दिनेश बन्सोड इत्यादी विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सहलीचा आनंद घेऊन सहकार्य केले.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

21
1855 views

Comment