logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न सभागृहात अत्यंत तळमळीने आणि ठामपणे मांडताना प्रवीण विरभद्रया स्वामी


*शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याच्या घामाचा प्रत्येक थेंब हा देशाच्या प्रगतीचा पाया आहे.

शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न सभागृहात अत्यंत तळमळीने आणि ठामपणे मांडताना प्रवीण विरभद्रया स्वामी यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला.*

*यावेळी त्यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे —*

🔹 शेतमालाला योग्य हमीभाव देऊन बाजारातील दलाल साखळीवर नियंत्रण आणावे
🔹 पिकविमा योजनेतील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी
🔹 वाढीव वीज बिल रद्द करून शेतीपंपांसाठी सवलतीचा दर लागू करावा
🔹 दुष्काळ, अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीग्रस्त भागांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे
🔹 अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करून शेतीला कायमस्वरूपी पाणीपुरवठा करावा
🔹 शेतकऱ्यांना सुलभ कर्जव्यवस्था व कर्जमाफीबाबत ठोस निर्णय घ्यावा
🔹 खत, बियाणे व कीटकनाशकांचा पुरेसा व दर्जेदार पुरवठा सुनिश्चित करावा
🔹 शेतकरी कुटुंबांसाठी आरोग्य व शिक्षण सुविधा बळकट कराव्यात

👉 तसेच एक अत्यंत महत्त्वाची आणि रास्त मागणी —

*आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला केवळ तुटपुंजे आर्थिक सहाय्य देणे पुरेसे नाही. त्यांच्या कुटुंबातील किमान एका सदस्याला सरकारी नोकरीत आरक्षण देण्याचा ठोस निर्णय झाला पाहिजे.*

अगदी रास्त मागणी असून यासाठी महाराष्ट्रभर रान उठवले पाहिजे.

*“शेतकरी वाचला तर देश वाचेल” ही भूमिका स्पष्ट करत त्यांनी सरकारला तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले.*

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
13 views

Comment