logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

वनराई फॉउंडेशन (सामाजिक NGO) तर्फे ६० अंगणवाडी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप सामाजिक एकता व स्वाभिमान जागृतीचा उपक्रम....!


खैरी चिखली/तरोडा : छत्रपती शिवाजी महाराज व गाडगे महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वनराई फॉउंडेशनच्या वतीने ग्रामपंचायत खैरी चिखली/तरोडा अंतर्गत हिरकणी अंगणवाडी येथे ६० विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक एकता व स्वाभिमानाची भावना जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ग्रामीण भागातील लहान विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात प्रोत्साहन मिळावे व त्यांचा आत्मविश्वास वाढावा, हा कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच/ सचिव यांची उपस्थिती होती. वनराई फॉउंडेशनच्या संचालिका अश्विनीताई सागरजी दुधाने यांच्या प्रमुख उपस्थितीत युवनेशजी चाफले, सुनीलजी काळबांडे, विकास सोमकुवर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच गावातील सरपंच, सर्व ग्रा.सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सहयोग अंकितजी रंगारी यांनी केले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत एकात्मता, स्वच्छता व समाजसेवेचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले.
वनराई फॉउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमामुळे संयुक्त जयंती अर्थपूर्ण रीतीने साजरी होत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक एकता व स्वाभिमान जागृतीचा संदेश देण्यात आला.

6
814 views

Comment