१० लाखांसाठी विवाहितेचा छळ
जळगाव : व्यवसाय वाढविण्यासाठी
माहेरून १० लाख रुपये आणावेत, यासाठी मसिरा शेख अजीम (२३) या विवाहितेचा सासरच्यांनी छळ केला. हा प्रकार सन २०२३ पासून सुरू होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ संजीव मोरे करीत आहेत.