जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मेंढा येथे ऐतिहासिक यश
मेंढा (वार्ताहर) – एन.एम.एम.एस. (इयत्ता 8 वी) परीक्षा 2025 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मेंढा येथील तब्बल 11 विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी 11 विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची नोंद झाली असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये ढोरमारे सृष्टी विजयकुमार, जावळे भावना बालाजी, गवळी श्रेया सुखदेव, ढोरमारे तनवी हरिराम, शेख जोया बालरफीक, वाघमारे प्रांजली संजय, भिसे आर्यन नितीन, गिरी प्रतिभा मंगेश, सगर स्मिता महेश, भिसे पायल नारायण व ढोरमारे गायत्री तानाजी यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत कार्यालय मेंढा तसेच सर्व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
या ऐतिहासिक यशामुळे शाळेची शैक्षणिक परंपरा अधिक बळकट झाली असून भविष्यातही अशीच यशाची परंपरा कायम राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.