logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पालघरचा मान उंचावला! खासदार डॉ. हेमंत सवरा यांची मलेशिया संसदीय मैत्रीगटात निवड

पालघर लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉ. हेमंतजी सवरा यांच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. लोकसभा अध्यक्ष मा. ओम बिर्ला यांनी भारताचे जागतिक स्तरावरील संसदीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या ‘संसदीय मैत्री गटात’ (Parliamentary Friendship Group) डॉ. सवरा यांची मलेशिया देशासाठी निवड करण्यात आली आहे.
काय आहे 'संसदीय मैत्री गट' उपक्रम?
भारताची जागतिक उपस्थिती अधिक बळकट करणे आणि विविध देशांच्या संसदांमध्ये थेट संवाद प्रस्थापित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. लोकसभा अध्यक्षांनी ६० हून अधिक देशांसाठी असे गट तयार केले असून, त्यामध्ये विविध पक्षांच्या खासदारांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ तब्बल ६४ देशांचा दौरा करणार असून, संसदीय रणनीती आणि द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा करणार आहे.
मलेशिया दौऱ्यात 'या' विषयांवर होणार चर्चा:
खासदार डॉ. हेमंत सवरा यांचा समावेश असलेल्या या शिष्टमंडळाकडून मलेशिया दौऱ्यात खालील महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा केली जाणार आहे:
• व्यापार आणि गुंतवणूक: दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांना नवी गती देणे.
• तंत्रज्ञान आणि शिक्षण: आधुनिक तंत्रज्ञान आणि शैक्षणिक देवाण-घेवाण वाढवणे.
• सांस्कृतिक समन्वय: भारत आणि मलेशियामधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करणे.
• संसदीय कार्यप्रणाली: दोन्ही देशांच्या संसदीय लोकशाहीतील उत्तम पद्धतींची देवाण-घेवाण करणे.
पालघरमध्ये आनंदाचे वातावरण
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी पालघरच्या खासदारांना मिळाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. "पालघरच्या जनतेने दिलेला विश्वास आणि साहेबांचे कार्य यामुळेच आज त्यांना जागतिक पातळीवर ही मोठी जबाबदारी मिळाली आहे," अशा भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
या नियुक्तीबद्दल डॉ. हेमंत सवरा यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील यशस्वी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

56
5297 views

Comment