logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शिवनेरी बुद्ध लेणी संवर्धन व अभ्यास कार्यशाळा उत्साहात संपन्न

जुन्नर (पुणे): शिवनेरी परिसरातील प्राचीन बुद्ध लेण्यांचे जतन, संवर्धन व ऐतिहासिक अभ्यास या उद्देशाने “शिवनेरी बुद्ध लेणी कार्यशाळा” नुकतीच उत्साहात पार पडली. या कार्यशाळेचे आयोजन एम.बी.सी.पी.आर. समूह महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रविवार दि. 22 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते.

कार्यशाळेची सुरुवात लेण्यांची स्वच्छता करून करण्यात आली. सहभागी सदस्यांना लेण्यांचा इतिहास, वास्तुशैली, बौद्ध वारसा, धम्मलिपी व सांस्कृतिक महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्राचीन बौद्ध स्थळांचे जतन करण्याची गरज आणि जनजागृती यावर विशेष भर देण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान लेणी स्वच्छता उपक्रम, इतिहास मार्गदर्शन सत्र आणि प्रत्यक्ष स्थळ अभ्यास असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. प्रत्यक्ष लेणीवरील धम्मलिपी मधील शिलालेखांचे वाचन सहभागी सदस्यांनी केले. सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यशाळेला लाभला. या कार्यशाळेत सातवाहन कालीन पेहराव केलेले सदस्य मुख्य आकर्षण ठरले.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश बौद्ध वारसा स्थळांचे संरक्षण, संशोधन व जनजागृती करणे हा असून भविष्यातही अशा ऐतिहासिक कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सागीतले

10
1957 views

Comment