जळगाव तालुक्यातील दिव्यांग कल्याणासाठी जिल्हा परिषद 5%सेस फंडातून दिव्यांग पुरुष आणि महिला पात्र प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित
जळगाव तालुक्यातील दिव्यांग कल्याणासाठी जिल्हा परिषद 5%सेस फंडातून दिव्यांग पुरुष आणि महिला पात्र प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . दिनांक 18/2/2026 ते 24/2/2026 सेन्ट ग्रामीण स्वयम रोजगार प्रशिक्षण संस्था महाबळ रोड, जिल्हा पशुवैद्यकीय हॉस्पिटलच्या पाठीमागे जळगाव येथे पहीली टर्म पार पडली त्या मधे 35 दिव्यांग उपस्थित होते त्यामधे दिव्यांगाना बॅकेची माहीती, व्यवसाय कसा करावा,खेळ खेळवले,इ अनेक विषयांवर चर्चा या 6 दिवसाच्या कार्यशाळांमध्ये शिकवण्यात आले या वेळी सेन्ट ग्रामीण स्वयम रोजगार चे संचालक श्री सुमीत कुमार झा
श्री दिग्विजय खंबायत- प्रशिक्षक
सौ संजीवनी मोरे - प्रशिक्षक
श्री सचिन मराठे
श्री कल्पेश देवरे
सौ अश्विनी मराठे इ उपस्थित होते त्या वेळी *प्रहार दिव्यांग क्रांति संघटना चे जिल्हा सह सचिव* श्री मनोहर बारी शिरसोली यांनी व सर्व दिव्यांनगानी माण्यवराचे आभार मानले.