logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

परभणी जिल्ह्याचे नवीन पालक सचिव IAS तुकाराम मुंढे.


महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने विविध जिल्ह्यांच्या पालक सचिवांच्या नियुक्त्यांबाबत आदेश जारी केले आहेत. मंत्रालय, मुंबई येथून २३ फेब्रुवारी रोजी हा शासन आदेश काढण्यात आला.

या आदेशानुसार परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदी श्री. तुकाराम मुंढे (सचिव, दिव्यांग कल्याण विभाग) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ही जबाबदारी श्री. दीपक कपूर (अपर मुख्य सचिव, जलसंपदा विभाग) यांच्याकडे होती. प्रशासकीय कारणास्तव राज्यातील काही जिल्ह्यांच्या पालक सचिवांमध्ये बदल करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नव्याने नियुक्त पालक सचिव लवकरच कार्यभार स्वीकारणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

5
1305 views

Comment