** रायबा हेच का आपले स्वराज्य महानाट्य कार्यक्रमाने श्रीपुरकरांचे मने जिंकले,,**
श्रीपुर,,
येथील महामानव प्रतिष्ठान चे वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
*रायबा हेच का आपलं स्वराज्य*
छत्रपती शिवरायांच्या शिव विचारांने स्पर्श करणारे तडाखेबाज महानाट्य जय हो एन्टरटेन्मेंट पुणे निर्मित महानाट्य या अत्यंत सुंदर व देखण्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गेल्या कित्येक वर्षांपासून श्रीपूरकर रसिकांना अशा ऐतिहासिक सामाजिक विषयांवर गाजलेली कलाकृती पहायला मिळाली त्यामुळे या कार्यक्रमाने श्रीपूरकरांची मने जिंकली नव्हे अडीच तास जागेवर खिळवून ठेवले छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेचा विचार स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात त्यांना काय अभिप्रेत होते हे अत्यंत सुंदर सादरीकरण करण्यात आले अक्षरशः हजारो रसिकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं एवढा शिव ऐतिहासिक सोहळा पहायला मिळाला अचूक टायमिंग उत्तम अभिनय हुबेहूब कलाकृती ऐतिहासिक वातावरण यामुळे *महामानव प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे कौतुकास पात्र ठरले*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत सर्व जाती धर्मातील शूर मर्द मावळे होते हा संदेश देण्यात आला राज्यातील शेतकरी किती अडचणीत आहे त्यांचं दुःख हाल अपेष्टा कशा आहेत हे प्रहसन अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारे ठरले अफझलखान व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतापगडावर झालेली भेट दिलेरखान शाहिस्तेखान यांच्यासारख्या मातब्बर बलाढ्य शत्रू बरोबरील घनघोर रणसंग्राम हे प्रसंग अक्षरशः डोळ्या समोर जसेच्या तसे सादर केले कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्यासाठी स्वतःचे मुलाचे रायबाचे लग्न बाजूला ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वामी निष्ठेने प्रेरीत झालेल्या शूरवीर तानाजी शेलारमामा यांचा त्याग अनेकांच्या अश्रूंना वाट मोकळी करून देणारा ठरला एकंदरीत स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य कसे चालवलं रयत कशी संभाळली स्वराज्यात आया बहिणींना संरक्षण दिले एका अभागी तरुणींवर रांझेचा पाटील यांनी अत्याचार केला तो मस्तीत गुर्मीत बोलत होता महाराजांना उलट बोलत होता तेव्हा अशा मस्तवाल पाटलांचे हात पाय तोडण्याचा महाराजांनी दिलेला आदेश व तो प्रसंग घटना पहाताना अनेकांना स्वराज्य कारभार आठवला कार्यक्रमाचे अत्यंत उत्कृष्ट देखणे सादरीकरण व नेमका संदेश देण्याचा विचार अनेकांना भावला कुठेही नाव ठेवायला किंवा भ्रमनिरास होईल असा प्रसंग रटाळ वाटला नाही सर्वच कलाकारांनी जिव ओतून काम केले विशेष म्हणजे अनेक मावळे शत्रू यांच्यातील तुंबळ युध्दाचा प्रसंग हातात ढाल तलवार घेऊन प्रेक्षकांच्या आजूबाजूला व व्यासपीठावर व व्यासपीठ खाली दाखवला त्यामुळे असे नाट्यमय घटना प्रसंग दुर्मिळ क्षण पहाण्याचे सौभाग्य रसिकांना मिळाले छत्रपती शिवाजी महाराज मा जिजाऊ नरवीर तानाजी मालुसरे शेलार मामा वीर शीवा काशीद अफझलखान या भुमिका करणारे कलाकार मोठ्या ताकदीचे आहेत शिवराज्याभिषेक सोहळा हा नयनरम्य व सुखद अनुभव देणारा ठरला हल्लीची तरुणाई व्यसन मोबाईल व संस्कार हीन बनली आहे त्यामुळे एक पिढी वाया गेल्याचा अत्यंत हेलावणारा प्रसंग सर्वांना विचार करायला लावणारा ठरला हा कार्यक्रम सादर होत असताना प्रेक्षक इतके तल्लीन व मग्न झाले होते की कुठेही आवाज नाही गोंधळ नाही त्यामुळे पहिल्यांदा इतका कार्यक्रम शांततेत व सर्वांना एकत्रित पाहता आला
*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महामानव प्रतिष्ठान चे वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील ज्येष्ठ नेते रामचंद्र सावंत पाटील नगरसेवक नानासाहेब मुंडफणे उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील प्रगतशील बागायतदार अविनाश इनामदार नगराध्यक्षा पती अशोक चव्हाण आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष शामराव भोसले जिल्हा सचिव भारत आठवले माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे*
अनेक सामाजिक कार्यकर्ते नेते संघटना यांचे पदाधिकारी पुरुष महिला मोठ्या संख्येने कार्यक्रम पहाण्यासाठी उपस्थित होते
*हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महामानव प्रतिष्ठान चे आधारस्तंभ विश्वजीत भालशंकर अजित भोसले प्रथमेश लोंढे सतीश भाऊ हाके पाटील यांच्या नेतृत्वाखाली जयंती अध्यक्ष योगेश गाडे उपाध्यक्ष अक्षय शिरसट व त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले*
डीजे डॉल्बी यांना बगल देऊन असे ऐतिहासिक सांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रम होत असल्याचे पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त केले