दुचाकीवरील दोन महिलांच्या सोनपोत लांबविल्या
जळगाव : दुचाकीवरून जात असलेल्या
दोन महिलांच्या सोनपोत अज्ञात चोरट्यांनी लांबविल्या. मोहननगर परिसरातून सीमा हसमुख सूर्यवंशी (४३, रा. देवेंद्रनगर) यांची एक तोळ्याची सोन्याची चेन व दोन भाराची चांदीची चेन लांबविली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिंगरोडवरून एका महिलेचीही सोनपोत लांबविली. मात्र, याप्रकरणी महिलेने तक्रार दिली नाही.
सीमा सूर्यवंशी या २२ फेब्रुवारी रोजी रात्री दूध केंद्र बंद करून दुचाकीवरून घरी जात होत्या.
त्यावेळी त्यांच्या दुचाकीच्या मागून एका दुचाकीवर दोन जण आले. त्यातील एका जणाने महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन व २ हजार रुपये किमतीची चांदीची चेन ओढून भरधाव वेगाने पसार झाले. यावेळी महिलेने स्वतःच्या दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केला. मात्र, ते सापडले नाही.