logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

विद्यार्थ्यांवर अन्याय झाला तर मनसे शांत बसणार नाही!! सोनल शिवाजी पाटील (सचिव, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना) (कार्यकारिणी सदस्य,

जोगेश्वरी पूर्व येथील ‘Pride Computer Classes’ मध्ये विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक लूट आणि फसवणूक मनसे स्टाईलने उघडकीस आणली.
नेमकी घटना काय?
जोगेश्वरी शाखेत जून २०२४ मध्ये दोन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. मात्र, क्लास प्रशासनाने त्यांना निम्मेच सॉफ्टवेअर शिकवले. उरलेल्या विषयांसाठी बॅचमध्ये जागा नसल्याचे कारण देत टाळाटाळ केली जात होती. इतकेच नव्हे तर, तेथील शिक्षक विद्यार्थ्यांशी अत्यंत उद्धटपणे वागत असत. या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांनी डिसेंबर २०२४ मध्ये फी परताव्याची (Refund) मागणी केली, पण क्लास व्यवस्थापनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
मनसेचा दणका आणि न्याय!
हा प्रकार जेव्हा माझ्याकडे (सोनाली शिवाजी पाटील) आला, तेव्हा मी, माझे सहकारी अभिलाष गुरव आणि मंगेश घा ड़ीगांवकर यांनी १७/०२/२०२६ रोजी तात्काळ क्लास गाठला. तिथे गेल्यावर देखील शिक्षक उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आम्ही आक्रमक पवित्रा घेत सर्व विद्यार्थ्यांना क्लासबाहेर काढले. मनसेचा हिसका दिसताच प्रशासनाचे धाबे दणाणले आणि त्यांनी तातडीने विद्यार्थ्यांचा Gpay नंबर मागवून अडकलेली फी पूर्णपणे रिफंड केली.
गंभीर त्रुटी आणि फसवणूक:
या आंदोलनादरम्यान काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत:
GST ची लूट: हा क्लास प्रत्येक विद्यार्थ्याकडून GST च्या नावाखाली वेगवेगळी रक्कम उकळत असल्याचे निदर्शनास आले आहे, ज्याचा कोणताही अधिकृत हिशोब दिला जात नाही.
अपूर्ण कोर्सेस: विद्यार्थ्यांना पूर्ण कोर्सेसचे आश्वासन देऊन प्रवेश दिला जातो, मात्र प्रत्यक्षात त्यांना अर्धेच ज्ञान देऊन वाऱ्यावर सोडले जाते.
अपमानस्पद वागणूक: शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना दिली जाणारी वागणूक ही शैक्षणिक संस्थेला काळिमा फासणारी आहे.
“विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी आणि पालकांच्या कष्टाच्या पैशांशी खेळणाऱ्या अशा संस्थांना आमचा इशारा आहे – विद्यार्थ्यांवर अन्याय झाला तर मनसे शांत बसणार नाही!!
सोनल शिवाजी पाटील
(सचिव, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना)
(कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना)
#mnsadhikrut #maharashtranavnirmansena #amitthackeray #mns #rajsahebthackeray

1
176 views

Comment