logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सांस्कृतिक समिती, एन एस एस व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गाडगे महाराज जयंती साजरी

उत्तमचंद बगडिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रिसोड येथे मराठी विभागाच्या वतीने गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी होते. त्यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात भोळ्या अंधश्रद्धेला बाबा मुळीच थारा देत नव्हते. त्यांच्या विचाराची झेप उंच होती; आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांनी अनेक रूढींवर प्रहार केले आहेत असे म्हटले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. एस. वी. टिकार यांनी आपल्या भाषणातबाबांनी आपल्या कीर्तनातून व्यसनाविरुद्ध,हुंडा निषेध,शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेचे चित्रणयावर मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे कुष्ठरोग्यांची सेवा,वृद्धाश्रम, अन्नसत्र,विविध धर्मशाळा बांधल्या .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. ए.जी. वानखेडे यांनी केले . प्रास्ताविक प्रा. डॉ. एम . पी खेडेकर यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकात प्रगतिशील विचारधारा आणि विज्ञाननिष्ठेची पताका हाती घेऊन बुरसटलेल्या पोथीनिष्ठ कर्मकांडांना लाथडणारा हा संत अशी प्रज्ञा प्राप्त झालेला एक झंजावत होता असे म्हटले. यावेळी "संत गाडगेबाबा व्यक्ती आणि कार्य"या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. निबंध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. प्रथम क्रमांक वैष्णवी घोडे द्वितीय क्रमांक प्रीतम वैराग, तृतीय क्रमांक हर्षदा देशमुख. कार्यक्रमाला प्रा.डॉ बुधवंत, डॉ नंदेश्वर, डॉ. मेश्राम, डॉ. नरवाडे, डॉ. काळे मॅडम, प्रा. मनवर, प्रा प्रजापती, प्रा. संदिप जुनघरे, प्रा.राम जुनघरे, प्रा.राऊत, प्रा. बाजड, प्रा. बोंडे मॅडम, प्रा. लाहोरे, प्रा.वाघ, श्री ओकार पूरी, श्रीमती भोसले , श्रीमती नरवाडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष घुगे, गोपाल कोल्हे, महेश पांडे, मयुर मगर, सुनिल चरारे यांनी परिश्रम घेतले . आभार श्री बिल्लारी यांनी केले. कार्यक्रमाला दीडशे विद्यार्थ्यांचे होते .

15
1229 views

Comment