logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

भिगवण प्रकरण: उद्या बारामती, इंदापूर आणि दौंडमध्ये ‘बंद’ची हाक; भिगवण मध्ये पोलिसांचा संचलन (रूट मार्च)...

Samarth News Aawaj Maharashtracha
Samarth News Aawaj Maharashtracha
⚡ ब्रेकिंग News
Home
भिगवण प्रकरण: उद्या बारामती, इंदापूर आणि दौंडमध्ये ‘बंद’ची हाक; भिगवण मध्ये पोलिसांचा संचलन (रूट मार्च)
Samarth News Aawaj MaharashtrachaFebruary 22, 20260
भिगवण:







भिगवण येथील प्रकरणातील पीडित तरुणीला न्याय मिळावा आणि तिची सुखरूप घरवापसी व्हावी, या मागणीसाठी उद्या, २३ फेब्रुवारी रोजी बारामती, इंदापूर आणि दौंड या तीन तालुक्यांमध्ये 'सकल हिंदू समाजा' च्या वतीने कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.

उद्याच्या बंदच्या पार्श्वभूमीवर आज भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भिगवण, मदनवाडी आणि तक्रारवाडी या गावांमध्ये पोलिसांकडून जोरदार 'रूट मार्च' (पथसंचलन) काढण्यात आला. या संचलनाद्वारे पोलिसांनी जनतेला शांततेचे आवाहन केले असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे व कायदा हातात न घेण्याचे बजावले आहे.

या रूट मार्चमध्ये प्रामुख्याने:

* अधिकारी: ३ वरिष्ठ पोलीस अधिकारी

* पोलीस अंमलदार: १० (स्थानिक पोलीस स्टेशन)

* SRPF (राज्य राखीव पोलीस बल): ६० जवान

* RCP (दंगल नियंत्रण पथक): २२ जवान

* होमगार्ड: आवश्यक संख्येत उपस्थित होते.

सध्या भिगवण आणि आसपासच्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांचे या भागावर बारीक लक्ष आहे.

0
0 views

Comment