निफाड तालुक्यातील उगाव येथील तरुणाचा मृतदेह चांदवड तालुक्यात परसुल शिवारात पुलाखाली सापडल्याने खळबळ! मृतदेहाच्या हातपाय बांधलेले असल्याने घातपाताच
प्रतिनिधी(निहाल शेख (तांबोळी)
सविस्तर बातमी चांदवड तालुक्यातील परसूल शिवार परिसरात आज सकाळी उघडकीस आलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. चांदवड ते निफाड मार्गावरील परसुल-चिंचोली नदीच्या पुलाखाली पाण्यात एका पुरुषाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिनांक. २२ फेब्रुवारी २०२६) सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास हा मृतदेह आला. तत्काळ चांदवड पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले व स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
पोलिसांनी केलेल्या पाहणीदरम्यान मृत व्यक्तीचे दोन्ही हात नायलॉन दोरीने
मांडीला बांधलेले, कमरेला अंदाजे २० ते ३० किलो वजनाचे डंबेल्स बांधलेले तसेच तोंड कपड्याने घट्ट आवळलेले असल्याचे आढळून आले. मृताच्या अंगावर लाल रंगाचा हुडी टी-शर्ट, निळ्या रंगाची ट्रॅक पँट आणि पायात ९ नंबरची पॅरॉगॉन कंपनीची चप्पल असल्याचे दिसून आले. या सर्व बाबींवरून तरुणाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
प्राथमिक तपासात मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न करण्यात आले असता तो निफाड तालुक्यातील उगाव येथील रहिवासी शादाब रज्जाक तांबोळी (वय ३०) यांचा असल्याचे सांगण्यात आले.
शादाब तांबोळी हे दि. १८ फेब्रुवारी २०२६ पासून उगाव येथून बेपत्ता असल्याची नोंद निफाड पोलिस ठाण्यात करण्यात आली
होती. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच
होती. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच निफाड पोलिस ठाण्याचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. हा मृत्यू नैसर्गिक नसून घातपाताचा असल्याचा संशय नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
घटनास्थळ पंचनामा, वैद्यकीय तपासणी व तांत्रिक पुरावे संकलित करण्याची प्रक्रिया सुरू असून बाळासाहेब पाटील (पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण), मिरखेलकर (अप्पर पोलीस अधीक्षक) तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद मगर यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड व निफाड पोलिसांकडून संयुक्तरीत्या तपास करण्यात येत आहे.
उगाव येथे संतापाचे वातावरण असून
संबंधित प्रकरणाचा लवकर उलगडा