logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सेवाभावाचा संदेश देणारी सायकल रॅली उत्साहात संपन्न



अहिल्यानगर, दि. २२ - श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त आयोजित भव्य सायकल रॅलीचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. या रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून करण्यात आली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, बलदेव सिंग वाही, अमरप्रीत वाही, अमनदीप वाही, अश्विंदर मल्होत्रा, ब्रह्मा लोंगियानी, मोंटू लोंगियानी, इकजस नारंग, गुरजस नारंग, हरप्रीत नारंग, कुलबीर सिंग वाही, रविंदर सिंग नारंग आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून सुरू झालेली ही रॅली सुरभी हॉस्पिटल, गुलमोहर पोलीस चौकी, श्रीराम चौक, प्रोफेसर कॉलनी चौक, प्रेमदान चौक, नायरा पेट्रोल पंप, दिल्ली गेट, मार्केट यार्ड, कोटला स्टँड आणि डीएसपी चौक मार्गे मार्गक्रमण करत भाई दया सिंह जी गुरुद्वारा येथे पोहोचली. तेथे या रॅलीचा समारोप करण्यात आला.

या सायकल रॅलीमध्ये युवक-युवती, क्रीडाप्रेमी, सामाजिक संस्था, सायकलिंग क्लबचे सदस्य तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “निरोगी राहा, सायकल चालवा” तसेच “धर्म, एकता आणि सेवाभाव” असा संदेश देत ही रॅली अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.

#CycleRally #Ahilyanagar #FitIndia #CyclingCommunity #GuruTeghBahadurJi #HealthyLiving #SomnathGharge #PoliceUpdate #SocialMessage #अहिल्यानगर #सायकल_रॅली #फिट_इंडिया #आरोग्य #गुरु_तेग_बहादूर_जी #सेवाभाव #एकता #जिल्हा_प्रशासन

10
57 views

Comment