logo

अल्पवयीन मुलाकडून घरफोडी करवून घेणाऱ्या आईवर गुन्हा


धुळे : आझाद नगर पोलिस ठाण्यांतर्गत

एका घरफोडीच्या गुन्ह्यात धक्कादायक बाब समोर आली असून, स्वतःच्या अल्पवयीन मुलाला चोरीसाठी प्रवृत्त करणाऱ्या आणि चोरीचा माल पचवणाऱ्या आईवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ९५ नुसार कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात या कलमाचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

धुळे येथील रहिवासी छायाबाई कुरे यांच्या घरात घरफोडी झाली होती. या चोरीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली होती. तपासादरम्यान एका अल्पवयीन मुलाचा सहभाग गुन्ह्यात निष्पन्न झाला होता.

0
0 views