अमळनेरमध्ये २१ फेब्रुवारीला भव्य दिव्य सत्संग सभा; सारंगपूरहून पू. भक्ती सागर स्वामीजी व पू. आनंद वर्धन स्वामींचे मंगल आगमन
अमळनेरमध्ये २१ फेब्रुवारीला भव्य दिव्य सत्संग सभा; सारंगपूरहून पू. भक्ती सागर स्वामीजी व पू. आनंद वर्धन स्वामींचे मंगल आगमन
पूज्य संतांच्या दर्शनाने आणि अमृतवाणीने भक्तिमय वातावरणाची अनुभूती घेण्याचे आवाहन
अमळनेर प्रतिनिधी :(ईश्वर महाजन)
बी.ए.पी.एस. श्री स्वामिनारायण मंदिर, स्टेशन रोड, अमळनेर येथे शनिवार, दि. 21 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8.30 ते 10.00 या वेळेत भव्य दिव्य सत्संग सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष प्रसंगी सारंगपूर येथून पूज्य भक्ती सागर स्वामीजी आणि पूज्य आनंद वर्धन स्वामी यांचे मंगलमय आगमन होणार असल्याने अमळनेर शहरातील हरीभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या दिव्य सत्संग सभेत संतांच्या पवित्र दर्शनाचा लाभ तसेच त्यांच्या अमृततुल्य वाणीचा आध्यात्मिक संदेश ऐकण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे. संतांच्या सान्निध्यात जीवनमूल्ये, संस्कार आणि आध्यात्मिक उन्नती याविषयी मार्गदर्शन होणार असून, भक्तांच्या मनात श्रद्धा, शांती आणि सकारात्मक ऊर्जा जागृत होईल, अशी भावना व्यक्त होत आहे.
प्रगट ब्रह्मस्वरूप परम पूज्य महंतस्वामी महाराज यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेली ही सभा बालक-बालिका, युवक-युवती तसेच महिला-पुरुष अशा सर्व हरीभक्तांसाठी आत्मिक आनंदाचा पर्व ठरणार आहे.
मंदिर समितीच्या वतीने सर्वांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या दिव्य क्षणांचा लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन करण्यात आले आहे.
“जय स्वामिनारायण”