logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

काटोल तालुक्यातील चिखली (मैना) येथे शिवजयंती उत्साहात साजरी...!

काटोल प्रतिनिधी :-
काटोल तालुक्यातील चिखली (मैना) येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमास गावातील जेष्ठ मंडळी, नागरिक, महिला, युवक-युवती तसेच समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी शिवाजी महाराजांच्या पराक्रम, स्वराज्य स्थापनेचा इतिहास तसेच त्यांच्या प्रेरणादायी विचारांवर मार्गदर्शन करण्यात आले. शिवाजी महाराजांनी दिलेला शिस्त, धैर्य, संघटनशक्ती व स्त्रीसन्मानाचा संदेश आजच्या पिढीने आत्मसात करावा, असे आव्हान वक्त्यांनी केले.
कार्यक्रमात शिवचरित्रावर आधारित भाषणे सादर केली. महिला वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग आणि ग्रामस्थांची उपस्थिती उल्लेखनीय होती.
कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यात आली. संपूर्ण चिखली (मैना) गावात शिवजयंतीचा उत्साह आणि शिवभक्तीचे वातावरण अनुभवायला मिळाले.
जय भवानी! जय शिवाजी! 🚩

268
5383 views

Comment