logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

चोरीच्या गुन्ह्यातील वाहन कारवाईदरम्यान हस्तगत झाल्याबाबत . . . .

जि . ठाणे / ता. कल्याण
कल्याण तालुक्यातील डोंबिवली वाहतूक उपशाखा अंतर्गत कैलास लस्सी सेंटर परिसरात वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या तसेच नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. श्रीराम पाटील यांनी पोलीस हवालदार क्र. ४३७० पगारे यांना आदेश दिले होते.
माननीय वरिष्ठांच्या आदेशानुसार पो. हवा. क्र. ४३७० पगारे हे संबंधित ठिकाणी वाहतूक नियंत्रण व कारवाई करीत असताना रोडवर वाहतुकीस अडथळा निर्माण करून उभी असलेली एक्टिवा दुचाकी (क्र. MH-05/DP-6117) आढळून आली. सदर वाहन संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्याबाबत सखोल पडताळणी केली.
चौकशीअंती सदर वाहनाबाबत टिळक नगर पोलीस ठाणे, डोंबिवली येथे दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हा रजिस्टर क्र. 49/2026, भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये वाहन चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
सदर माहिती प्राप्त होताच पो. हवा. क्र. ४३७० पगारे यांनी तात्काळ संपूर्ण बाब सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. एस. व्ही. पाटील यांना कळविली. त्यानुसार चोरीस गेलेली एक्टिवा दुचाकी ताब्यात घेऊन वाहतूक उपशाखा, डोंबिवली पूर्व येथे सुरक्षित ठेवण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
डोंबिवली वाहतूक विभागाकडून वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करताना गुन्हे उघडकीस आणण्याचे कार्य सातत्याने करण्यात येत आहे.
सविनय सादर,
(श्रीराम पाटील)
सहाय्यक पोलीस निरीक्षक
डोंबिवली वाहतूक उपविभाग

69
2919 views

Comment