logo

सौ.प्रियदर्शनी पाटील पंचायत समिती चेंढरे गटात निवडून आल्या बद्दल सौ. स्वाती आफळे अलिबाग यांनी सत्कार केला

आज दिनांक १९/०२/२६
महाराष्ट्र राज्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आजच्या दिवसाचं औचित्य साधून कर्तव्य दक्ष पोलिस मित्र फाउंडेशन नाशिक तर्फे चेंढरे अलिबाग रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्र च्या सौ. प्रियदर्शनी संजय पाटील पंचायत समिती चेंढरे मधून प्रचंड मतांनी निवडून आल्या बद्दल श्री फळ ,शाल, गुलाब पुष्प गुच्छ व आपल्या भारत देशाचे संविधान फ्रेम देऊन सन्मानित करण्यात आले. याच दरम्यान रायगड जिल्हा चा बेनर चे मा. पाटील मेडम च्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ही संपूर्ण जबाबदारी
कर्तव्य दक्ष पोलिस मित्र फाउंडेशन नाशिक च्या सदस्यां व अलिबाग रायगड जिल्हा महाराष्ट्र च्या महिला अध्यक्षा सौ.स्वाती ताई सुनील आफळे यांनी पार पाडली आहे.
याच दरम्यान आपल्या संस्थेची संपूर्ण माहिती दिली . विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी ची माहिती दिली. त्यांनी आपल्या संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष मा. डॉ. सुनील भाऊ परदेशी सर जी चे कौतुक केले व प्रथम वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.
नंतर " स्वाती ताई तुमचेही अभिनंदन! आपल्या सर्वोत्तम कामगिरीसाठी तुम्हाला सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले . "

14
676 views