
सैलानी बाबा यात्रा 2026 संबंधाने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिली सैलानी येथे भेट. Shaikh Asif AIMI NEWS BULDHANA Maharashtra
पिंपळगाव सरांई : सर्व जाती धार्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबा यात्रा येथे दरवर्षी लाखो भाविक सैलानी येथे दाखल होत असतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा सैलानी बाबा यांची यात्रा जवळ आल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या करीता प्रशासनाने वेळोवेळी सर्व विभागाच्या मिटिंग घेण्यात आल्या आहेत.
त्या अनुषंगाने आज दिनांक 18/02/2026 रोजी मा. पोलीस अधीक्षक साहेब बुलडाणा श्री निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली मा. अपर पोलीस अधीक्षक साहेब बुलडाणा श्री. अमोल गायकवाड, रायपूर ठाणेदार निलेश सोळंके, तत्कालीन ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी सैलानी बाबा यात्रा संदर्भाने पिंपळगाव सरांई येथे संदल घर तसेच संदल मिरवणूकीच्या मार्गाची पाहणी करून ग्रामपंचायत यांना मिरवणूकीच्या मार्गात असलेल्या अडचणी दूर करण्याबाबत सूचना दिल्या तसेच सैलानी बाबा दर्गा येथे भेट देऊन CCTV कॅमेरे, दर्शन रांग यांचे योग्य नियोजन करून तसेच योग्य बंदोबस्त नेमूण कोणतीही दुर्घटना घडू नये या बाबत ठाणेदार निलेश सोळंके यांना सूचना देण्यात आल्या. तसेच परंपरागत जळण्यात येणाऱ्या होळी च्या ठिकाणी तसेच झिरा परिसर तसेच भाविकांसाठी करण्यात येणाऱ्या वाहन पार्किंग च्या ठिकाणी सुद्धा भेट देण्यात आली व तशा संबंधितांना सूचना देण्यात आल्या. सैलानी यात्रा बंदोबस्त अधिक सक्षम व सुयोग्य पद्धतीने राबविण्यासाठी दिशा मिळाली असून भाविकांनीही प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.त्यावेळी तेथे पिंपळगाव सरांई येथील सरपंच पती श्री केशव तरमले, पोलीस पाटील रामेश्वर गवते, सैलानी येथील शफिक मुजावर, रशीद मुजावर, पोलीस अंमलदार राहुल जाधव, कळमकर, अख्तर शेख, काझी असे हजर होते.