logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

क्लासेस संघटनेतर्फे शिवजयंतीदिनीनिमित्त आदिवासी विद्यार्थिनींना वह्या वाटप


नाशिक : येथील नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना पीसीसीडीए या संस्थेच्यावतीने, जवळपास पन्नास हजार रुपये किंमतीच्या वह्या आणि शैक्षणिक साहित्य, आदिवासी विद्यार्थिनींना वाटप करुन विधायक कार्याने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी दिली. हरसुल येथील विश्व हिंदू परिषदेने संचलित केलेल्या कन्याछात्रालयातील १२० आदिवासी गरिब होतकरु विद्यार्थिनींना उद्या शिवजयंतीचे औचित्य साधून या साहित्याचे वितरण होईल. यासाठी योगेश बोरसे, निलेश दूसे, रविंद्र पाटील, अनुराधा दुशिंग, उमादेवी विश्वकर्मा, नितिन कुमार, कांता घाडगे, जयवंत जाधव, कैलास देसले, दिपक शिवले, गणेश पवार, अनंत चांदवडकर, क्षिरसागर सर, दिपक पाटील, रोहीत जोशी, निखिल जोशी, हरिभाऊ वाकचौरे, मेघा कामळस्कर, विनोद खरोटे, चेतन माडीवाले, महेश थोरात, आमीन शहा, बी के जेना, किरण सुर्यवंशी, प्रज्ञा पगार, विष्णू चव्हाण, आरती खाबिया, सुनिता जोशी, शिवाजीराव कांडेकर, निलेश देवरे, धनंजय भामरे, स्नेहल थोरात, युवराज कराड, नंदकुमार देशपांडे, प्रवीण गडाख, दिनकर नेहे, मयुर जाधव, प्रितेश जाधव, राहूल सोनार, मुकुंद रनाळकर, नील काबरा, रमेश उपाध्ये, जयेश सोनवणे, सुजीत राजेगांवकर, सुषमा परांजपे, दिलीप पवार, कैलास जेजूरे, लोकेश पारख, प्रतिभा देवरे, विवेक भोर, सुनील सोलंकी, पवन जोशी. सलिम रमाणी, भास्करराव भावसार, गणेश कोतकर, विद्या राकडे, सुधीर गायधनी, हेनरी सरदार,स्वप्नील जोशी, विनय सातपुरकर, अर्जुन शिंदे आदी क्लासेस संचालकांनी योगदान दिले. विश्व हिंदू परिषदेचे किर्तीश जोशी आणि छात्रालयाच्या अधिक्षिका गीता सहारे यांनी यासाठी विशेष सहकार्य केले.

2
114 views

Comment