
चिखलदरा येथे तालुका स्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम उत्साहात संपन्न
चिखलदरा (दि. 18 फेब्रुवारी 2026):
तालुका स्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम आज चिखलदरा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमास केवलराम काळे (आमदार) प्रमुख उपस्थिती म्हणून लाभले. तसेच धारणी येथील उपविभागीय अधिकारी, चिखलदरा येथील तहसीलदार व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, वीज समस्या, वनहक्क प्रकरणे, शासकीय योजनांचा लाभ, कुपोषण, आरोग्य व शिक्षण यासंबंधी अनेक तक्रारी व मागण्या मांडल्या. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारींची तत्काळ दखल घेत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
आमदार केवलराम काळे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
कार्यक्रमाला असंख्य नागरिकांची उपस्थिती लाभली असून प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात थेट संवाद साधण्याची संधी नागरिकांना मिळाली. त्यामुळे स्थानिक समस्यांच्या निराकरणासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.