logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नगरदेवळा शिवारात हातभट्टीवर पोलिसांचा छापा; १३ हजारांचा मुद्देमाल जप्त....

नगरदेवळा शिवारात हातभट्टीवर पोलिसांचा छापा; १३ हजारांचा मुद्देमाल जप्त!
पाचोरा प्रतिनिधी:-
जिल्हाध्यक्ष किरण अशोक सुर्यवंशी
पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा पोलीस दूरक्षेत्राच्या पथकाने आग्रावती धरणाजवळ असलेल्या आबा सोनू पाटील यांच्या शेताच्या कडेला सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १३ हजार रुपये किमतीचे रसायन आणि दारू गाळण्याचे साहित्य जप्त करून जागीच नष्ट केले आहे. याप्रकरणी संजू वसंत कुऱ्हाडे (वय ४२, रा. बेडरपुरा, नगरदेवळा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, नगरदेवळा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे यांना गुप्त माहिती मिळाली होती की, आग्रावती धरणाच्या कडेला झुडपांच्या आडोशाला बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टी लावून दारू गाळली जात आहे. या माहितीची खात्री करण्यासाठी दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास पोलिसांनी पंचांसह छापा टाकण्यात आला आहे.
पोलिसांनी लपत-छपत जाऊन पाहिले असता, संजू कुऱ्हाडे हा तीन दगडांच्या चुलीवर ड्रम ठेवून दारू गाळताना रंगेहात मिळून आला. पोलिसांनी त्याला जागीच ताब्यात घेतले. यामध्ये प्रत्येकी ३५ लिटर दारूने भरलेले दोन प्लास्टिक कॅन (किंमत ४,००० रुपये), २०० लिटरच्या ड्रममध्ये १०० लिटर उकळते गुळ-नवसागर मिश्रित रसायन (किंमत २,००० रुपये), ५० लिटर मापाचे १० प्लास्टिक ड्रम, ज्यात कच्चे रसायन भरलेले होते (किंमत ७,००० रुपये), दारू गाळण्यासाठी लागणारी प्लास्टिक नळी, लाकडी बाडगी व इतर साहित्य.
पोलिसांनी घटनास्थळावरून रसायनाचे नमुने घेऊन उर्वरित सर्व माल पंचांसमक्ष जागीच नष्ट केला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल वैभव रवींद्र पाटील (ब.नं. २५९३) यांच्या फिर्यादीवरून संजू कुऱ्हाडे याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई), (फ), (ब), (क) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे, सहाय्यक फौजदार निवृत्ती मोरे आणि पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाटील यांच्या पथकाने केली.

13
340 views

Comment