logo

कर्तव्य दक्ष पोलिस मित्र फाऊंडेशन चा पहिला वर्धापन दिन सोहळा उत्साहात व आनंदात नाशिक येथे पार पडला. सुनीलसिंग परदेशी

संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित राहिलेल्या सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच महिला-पुरुष बांधवांचे आम्ही मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
आपल्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी व संस्मरणीय ठरला. आपल्या उपस्थितीने संस्थेची एकजूट, विश्वास आणि कार्याची ताकद अधिक दृढ झाली.
आपले प्रेम, पाठबळ आणि सहकार्य भविष्यातही असेच लाभत राहो, हीच अपेक्षा.
आपले सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!

आज आपल्या उपस्थितीमुळे मला पुन्हा नव्याने काम करण्याची ताकद मिळाली आहे आज उपस्थित सर्वांचे नाव मनात इच्छा असूनही टाकू शकत नाही पण उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार तसेच या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अनेकांनी आर्थिक स्वरूपात तर तन मन अमुल्य वेळ काढून कार्यक्रम नियोजन जबाबदारी घेऊन पुढाकार घेतला अश्या माझ्या सर्व टिमचा मी शतशः आभारी आहे तुमच्या मेहनतीने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला तसेच उपस्थित सर्वांनी केलेल्या सहकार्य मुळे ही कार्यक्रम छान झाला
अनेक पदाधिकारी इच्छा असूनही येऊ शकले नाही यापेक्षा महत्त्वाचे काम असेल म्हणून उपस्थित राहू शकले नाही अश्या पदाधिकारी न आल्यामुळे कदाचित मीच कुठे तरी कमी पडलो आहे असं वाटायला लागले त्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी मी जोमाने कामाला सुरुवात करणार आहे आज आसान व्यवस्था, रांगोळी, दिप प्रज्वलन, सत्कार कामेटी, भोजन व्यवस्था साठी श्री संतोष मुळे व सर्व सहकारी यांनी घेतलेली जबाबदारी खुप मनापासून पुर्ण केली त्या मुळे सर्वांचे मनापासून आभार सुत्रसंचलन साऊंड सिस्टीम फोटो ग्राफर डिझाईन करणारा सर्वांनी वेळोवेळी सहकार्य केले मनापासून धन्यवाद
आजचा दिवस माझ्या आयुष्यातील खूप मोठा होता मला घडवणारे मार्गदर्शक करणारे सर्व बालपणापासूनच सहकारी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते हीच आपल्या कामाची पावती म्हणून लाभली
मी पुन्हा एकदा सर्वाचे मनापासून आभार मानतो धन्यवाद
नजरचुकीने घाई गडबडीत कोणाचा मान सन्मान करायचा राहून गेला असेल तर प्लीज समजून घ्या अतिशय कमी वेळात हा कार्यक्रम आयोजित केला होता तरीही सर्वांनी मिळून प्रयत्न केला आहे
आपला
सुनिल परदेशी

1
910 views