logo

Aima midiya jan jan ki avaj दिनांक 18.02.2026 11:35am पोलीस भरतीत पुणे पोलिसांचा कौतुकास्पद निर्णय लहान मुलांसह आलेल्या विवाहित महिला उमेदवारांना पुणे

Aima midiya jan jan ki avaj दिनांक 18.02.2026 11:35am
पोलीस भरतीत पुणे पोलिसांचा कौतुकास्पद निर्णय
लहान मुलांसह आलेल्या विवाहित महिला उमेदवारांना पुणे पोलिसांन कडून विशेष प्राधान्य; १६३३ शिपाई व १३० पुणे : पुणे शहर पोलीस दलातील भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. भरतीप्रकियेत विवाहित महिला सहभागी आहेत. लहान मुलांसोबत शारीरिक आणि मैदानी चाचणीसाठी आलेल्या महिला उमेदवारांच्या चाचणीस प्राधान्य देण्यात येणार आहे. पुणे पोलीस दलातील १६३३ शिपाई पदाच्या जागा आणि १३० बँडमनच्या जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेत एक लाख ३९ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

भरतीप्रक्रिया सोमवारपासून (१६ फेब्रुवारी) सुरू झाली आहे. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील मैदानावर भरतीप्रक्रिया पार पडणार आहे. त्यात काही विवाहित महिला उमेदवार सहभागी झाल्या आहेत. त्यांपैकी काही महिला उमेदवार या मुलांसोबत परगावाहून आल्या आहेत. मुलांसोबत शारीरिक आणि मैदानी चाचणीसाठी आलेल्या महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

हेही वाचा
EVM : ‘ईव्हीएम हॅक’वरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली!
अशी माहिती पुणे पोलिसांच्या प्रशासन विभागातील अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी दिली. पोलीस भरती प्रक्रियेत दररोज तीन हजार महिला उमेदवारांना बोलाविले जात आहे. भरती प्रक्रियेत विवाहित महिला उमेदवार सहभागी झाल्या आहेत. त्यांच्यासाेबत नातेवाईक आणि लहान मुले आहेत. पोलीस मुख्यालायातील सभागृहात त्यांना जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.


मुलांची काळजी घेण्याची सूचना बंदोबस्तावरील महिला पोलिसांना दिल्या आहेत. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस अयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त संजय पाटील, उपायुक्त डाॅ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.बँडमन पदांसाठी भरती सुरू.

5
13 views