logo

Aima midiya jan jan ki दिनांक 18.02.2026 9:47am मुळशी तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींची मुद त संपणार; प्रशासकीय अडचणीमुळे आता निवडणुका घेणेही अशक्य नियमा

Aima midiya jan jan ki दिनांक 18.02.2026 9:47am मुळशी तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींची मुद त संपणार; प्रशासकीय अडचणीमुळे आता निवडणुका घेणेही अशक्य नियमानुसार ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ हा पूर्ण व्हायच्या आत तेथे निवडणूक घेऊन नवीन ग्रामपंचायत कार्यकारिणी अस्तित्वात येणे आवश्यक असते.पिरंगुट : मुळशी तालुक्यामध्ये असलेल्या एकूण ९३ पैकी ४२ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. त्यावर आता प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुळशी तालुक्यातील या ४२ ग्रामपंचायतींवर प्रशासकराज येणार आहे.

दि. ८ ते दि. १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान तालुक्यातील एकूण ४२ ग्रामपंचायतींची मुदत ही टप्प्या-टप्प्याने समाप्त होत आहे. त्यामध्ये नियमानुसार ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ हा पूर्ण व्हायच्या आत तेथे निवडणूक घेऊन नवीन ग्रामपंचायत कार्यकारिणी अस्तित्वात येणे आवश्यक असते. परंतु जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी दि. ६ फेब्रुवारी रोजी काढलेल्या आदेशानुसार काही प्रशासकीय अडचणीमुळे आता लागलीच निवडणुका घेणे शक्य होणार नसल्याने पुढील सहा महिन्यांसाठी मुदत संपलेल्या मुळशी तालुक्यातील त्या ४२ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक केलेली आहे.

ग्रामपंचायतनिहाय नेमलेल्या प्रशासकांची नावे अशी

लवळे, भोईनी, कुळे, दखणे, मुगावडे, नांदगाव, भरे, अकोले, शेरे, चांदे, हिंजवडी या ग्रामपंचायतींवर विस्तार अधिकारी अजित साकोरे हे प्रशासक म्हणून काम पाहतील. घोटावडे, कासारसाई, नांदे, माण, मारुंजी या ग्रामपंचायतींवर विस्तार अधिकारी महादेव चव्हाण हे प्रशासक म्हणून काम पाहतील. उरवडे, कासार आंबोली, भालगुडी, पौड, भूकुम, मुठा, रिहे, जांबे या ग्रामपंचायतींवर विस्तार अधिकारी सोमा खैरे हे प्रशासक म्हणून काम पाहतील. कोळावडे, आंदगाव, चिंचवड, आंदेशे, खेचरे, चाले, बोतरवाडी, मांदेडे या ग्रामपंचायतीवर प्रतिभा राऊत या प्रशासक म्हणून काम पाहतील. साठेसाई, हाडशी, वाळेण येथे शरद बेलदार हे प्रशासक म्हणून काम पाहतील, तर नाणेगाव, चिखलगाव, आंबेगाव, कातरखडक, खांबोली, मुलखेड, नेरे येथील ग्रामपंचायतींवर सुवर्णा मेंगडे या प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत.

0
0 views