logo

Aima midiya jan jan ki दिनांक:9:33am सरसेनापती, सरदार, सुभेदार, वीर मावळे; पुण्यात शिवजयंतीच्या सोहळ्याला ९६ स्वराज्यरथांची मानवंदना सरदारांचे, मावळ्

Aima midiya jan jan ki
दिनांक:9:33am सरसेनापती, सरदार, सुभेदार, वीर मावळे; पुण्यात शिवजयंतीच्या सोहळ्याला ९६ स्वराज्यरथांची मानवंदना सरदारांचे, मावळ्यांचे, वीर. मातांचे स्फूर्ती देणारे ९६ स्वराज्यरथ, विविध पथकातील रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना, ढोल-ताशा पथकाचा रणगजर अशा उत्साही वातावरणात मिरवणुकीला सुरुवात होते.पुणे : शिवजयंती महोत्सव समिती, पुणेतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवजयंती गुरुवारी, दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता लालमहाल येथून “शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा” या भव्यदिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. मिरवणुकीचे यंदा सलग १४ वे वर्ष आहे. सरसेनापती, सरदार, सुभेदार, वीर मावळे आणि वीर मातांच्या तब्बल ९६ स्वराज्यरथांचा सहभाग हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य असणार आहे, अशी माहिती सोहळ्याचे संकल्पक आणि समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.

दरवर्षी जिजाऊ-शहाजी शिवज्योत रथ एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फूर्ती देणारे ९६ स्वराज्यरथ, विविध पथकातील रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना, ढोल-ताशा पथकाचा रणगजर अशा उत्साही वातावरणात मिरवणुकीला सुरुवात होते. या मिरवणुकीचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरली मोहोळ, पुणे महापौर मंजूषा नागपुरे, समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, पिंपरी चिंचवड महापौर रवी लांडगे, पोलिस उपायुक्त परिमंडळ १ कृषीकेश रावल, आमदार भीमराव तापकीर, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, शंकर मांडेकर तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सुनील रासने, ज्येष्ठ विधिज्ञ प्रताप परदेशी उपस्थित राहतील.

0
25 views