logo

१८ पासुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवज्योत महारॅली, विविध स्पर्धा, जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन

१८ पासुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवज्योत महारॅली, विविध स्पर्धा, जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन

एकविध क्रीडा संघटना व हिंदवी प्रतिष्ठान चा पुढाकार

विलास केजरकर भंडारा.

भंडारा:- एकविध क्रीडा संघटना व हिंदवी प्रतिष्ठान भंडारा यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगांना उजाळा देण्यासाठी बुधवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ सायं. ५ वाजता नगर परिषद गांधी विद्यालयातून शिवज्योत महारॅली ला प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यादरम्यान प्रत्येक चौकात बुधवारीपेठ हनुमान व्यायाम शाळा चांदणी चौक भंडारा येथील मंडळाचे कार्यकर्ते आत्मसंरक्षण, दांडपट्टा व तलवारबाजीचे प्रात्याक्षिके दाखविणार आहेत. शिवज्योत महारॅली गांधी विद्यालय - पोस्ट ऑफीस चौक गांधी चौक शास्त्री चौक श्री छत्रपती प्रतीकृती (पुतळा) शुक्रवारी येथे आरती प्रसाद वितरण करून सांगता करण्यात येईल. या महारॅलीत नंदगोपाल फाउंडेशन भंडारा, तसेच विविध संघटना सहभागी होणार आहेत. आणि गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २६ ला सकाळी ८ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रेल्वे मैदान खात रोड भंडारा येथील मैदानावर दोरीवरील उड्या, १०० मी. धावणे, बॉल कलेक्शन, पोता दौड, वयोगट १२ वर्षाखालील, १५ वर्षाखालील, १८ वर्षाखालील आणि ओपन गट (मुले, मुली) असे राहणार आहेत. सर्व गटातील अनुक्रमे प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांकांना मेडल्स व सर्व सह‌भागी खेळाडू स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात येईल. तसेच जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये ३० किलो वजनापासुन महिला -पुरूष गटासाठी जिल्हास्तरिय कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार आहे. प्रत्येक गटाला प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना मेडल व सर्व सह‌भागी खेळाडू स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी आधार कार्ड आणने आवश्यक आहे.
तरी जिल्ह्यातील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी व दांडपट्टा खेळाडू, जागृत नागरिकांनी विविध स्पर्धेत तसेच कुस्ती स्पर्धक महिला - पुरूषांनी स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन एकविध क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत इलमे, हिंदवी प्रतिष्ठान भंडाराचे संस्थापक जॅकी रॉवलानी यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीकरिता सुनील कुरंजेकर ९४२०५१५७२८, अशोक बन्सोड ९८६०७६२०२२, विलास केजरकर, प्रविण लिमजे ८९९९९६९९०६, ८६६८४१२०९०, शोएब अन्सारी ९८९०२१००२२, सौरभ तोमर ९७३००३३८८६, आशिक चूटे ७०२०४२८२८२२०, अरुण बांडेबुचे ९८२२७२७६०३, बेनीलाल चौधरी ८६६८९११५३०८, सरिन भोयर ९८३४८१६२१८ यांच्याशी संपर्क साधावे असे आयोजकांनी कळविले आहे.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

6
584 views