logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

स्व नरसिंगराव बोडखे विद्यालय धोडप बु. येथे इयत्ता दहावीच्या निरोप......

स्व नरसिंगराव बोडखे विद्यालय धोडप बु. येथे इयत्ता दहावीच्या निरोप......
धोडप बु.येथील स्व नरसिंगराव बोडखे विद्यालयातील इयत्ता दहावीच्या 2025-26 च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचा कार्यक्रम 17 फेब्रुवारी 2026 रोजी उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष रवींद्र भाऊ गायकवाड साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून शेषराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य सारंगधर गोटे सर, संस्थेचे सचिव संतोषराव गायकवाड साहेब, मुख्याध्यापक सज्जनराव बाजड सर, जि.प.प्राथमीक शाळेचे मुख्याध्यापक भुसारी सर ,प्राध्यापक तुकाराम वाघ यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. दीप प्रज्वलन व उपस्थित मान्यवरांच्या सत्कारानंतर रंगभरण कला स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व कलाशिक्षक अनंत बोडखे यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविका मधून ज्येष्ठ शिक्षक दिलीप भिसडे यांनी पुस्तकी ज्ञानासोबतच संस्कारी शिक्षण घेऊन आई-वडिलांची व समाजाची सेवा करणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले. प्राचार्य सारंगधर गोटे यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान व गणिताचे महत्त्व आपल्या मनोगततून सांगितले. तसेच संस्थेचे सचिव संतोषराव गायकवाड साहेब यांना विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या व भयमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे असे आपले मनोगततून व्यक्त केले. गणित शिक्षक श्रीकृष्ण रहाटे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ऊर्जा युक्त शिक्षणाचे महत्त्व व्यक्त केले. मुख्याध्यापक सज्जनराव बाजड सर यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनात यश प्राप्त होते असे सांगून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववी मधील प्रणाली बोडखे हिने केले. व आभार कु्.साक्षी खडसे हिने मानले. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली होती.

134
4816 views

Comment