logo

फार्मसीच्या विद्यार्थ्याची नैराश्यातून आत्महत्या


जळगाव : मित्र व शिक्षकांसमोर प्राचार्यांनी मारहाण केल्यामुळे नैराश्यात असलेल्या श्याम प्रभाकर पाटील (२०, रा. बोदवड) या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (१५) फेब्रुवारी) घडली आहे. विद्यार्थ्यांच्या खिशात सुसाइड नोट सापडली असून, त्यात प्राचार्यांनी मारहाण केल्याचा उल्लेख केला आहे.
तसेच त्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्राचार्य योगेश पवार
यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोदवड येथील रहिवासी श्याम पाटील हा गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसी येथे फार्मसीच्या द्वितीय वर्षाला होता. १५ फेब्रुवारी रोजी दौलतनगरमध्ये त्याने राहत्या खोलीमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या खिशात सुसाइड नोट सापडली आहे. त्यात कुठलीही चूक महाविद्यालयाच्या नसताना प्राचार्यांनी सर्वांसमोर मारहाण केल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणी मयताचे वडील प्रभाकर पाटील यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात प्राचार्य योगेश पवार यांनी मुलास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे म्हटले आहे. त्यावरून प्राचार्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5
397 views