logo

मा. आयुक्त, मनरेगा डॉ. भरत बास्टेवाड (भा.प्र.से.) यांनी घेतला जिल्ह्यांचा आढावा मजुरांच्या उपस्थितीबाबत आयुक्तांनी थेट ग्रामरोजगार सहाय्यकांसोबत ...

मा. आयुक्त, मनरेगा डॉ. भरत बास्टेवाड (भा.प्र.से.) यांनी घेतला जिल्ह्यांचा आढावा

मजुरांच्या उपस्थितीबाबत आयुक्तांनी थेट ग्रामरोजगार सहाय्यकांसोबत साधला संवाद

मनरेगाचे मा. आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड यांनी मनरेगा अंतर्गत जिल्ह्यांच्या कामकाजाचा दुरदृश प्रणालीद्वारे (VC) सविस्तर आढावा घेतला. बैठकीदरम्यान मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या कामांची प्रगती, अपूर्ण कामे, मजुरांची नोंदणी ई-केव्हयसी करणे, मजुरांची उपस्थिती, प्रलंबित देयके, उन्‍नती प्रकल्‍प, CPGRAM वरील तक्रारी याबाबत सविस्तर चर्चा करून आढावा घेण्यात आला.

आढावा बैठकीत आयुक्तांनी काही ग्रामपंचायतीतील कामांवरील मजुरांच्या उपस्थितीबाबत थेट ग्रामरोजगार सहाय्यकांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. कामावरील ई-मस्टर व प्रत्यक्ष मजुरांची उपस्थिती यामधील सुसंगती, कामांवरील नियमित उपस्थिती, तसेच वेळेवर नोंदी अद्ययावत करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.

मजुरांना मागणीनुसार रोजगार उपलब्ध करून देणे, उपस्थिती नोंद अचूक ठेवणे आणि वेतन वितरण वेळेत होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. कामांची गुणवत्ता व पारदर्शकता राखत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यावरही आयुक्तांनी भर दिला. तसेच, मनरेगा अंतर्गत क्षेत्रीय स्तरावर होणाऱ्या कामांचे प्रभावी सनियंत्रण करण्यासाठी आयुक्तालय स्तरावर विशेष सेल तयार करण्यात येणार असून सर्व जिल्ह्यात सनियंत्रण कक्ष (Monitoring Cell) तयार करण्याचे सूचना मा. आयुक्तांनी सर्व जिल्ह्यांना दिल्या.

या बैठकीस सर्व विभागाचे सहआयुक्त (रोहयो), सर्व जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी (रोहयो), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा/पंचायत), जिल्हा MIS समन्‍वयक, सर्व तालुक्यातील गट विकास अधिकारी व संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

#MGNREGA #मनरेगा #Review #RuralDevelopment #GoodGovernance #Monitoring #Transparency

Ministry Of Rural Development government of India
Mahatma Gandhi NREGA, Ministry of Rural Development, Government of India
CMOMaharashtra
Bharatsheth Gogawale -भरतशेठ गोगावले

13
726 views